मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांचा मनमानी कारभार व खोटया तक्रारीच्या त्रासास कंटाळून न.पा. कर्मचाऱ्यांनी २६ जानेवारी रोजी सुरु केलेले काम बंद आंदोलन मुख्याधिकाऱ्यांनी सुचना दिल्याने तुर्त मागे घेण्यात आले आहे.
मंगळवेढयाच्या नगराध्यक्षांवर शासन स्तरावर कारवाई सुरु असलेबाबतचे पत्राव्दारे कळवून जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासनाधिकारी व मुख्याधिकारी यांनी पत्र दिल्याने या पत्रास मान देवून तसेच नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सदरचे धरणे व काम बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करत असून नगराध्यक्षा अरूणा माळी यांच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा व्हावी म्हणून एक वेळ दुसरी संधी देण्यात येत असल्याचे न . पा . कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी सांगितले.
दरम्यान,नगराध्यक्षांनी यापुढे खोटया तक्रारी देवून कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिल्यास व त्यांच्या पतीचा हस्तक्षेप झाल्यास तसेच शासन स्तरावर नगराध्यक्षांवर सुरु असलेल्या कारवाईवर निर्णय न झाल्यास कोणत्याही वरिष्ठ कार्यालयाचे न ऐकता पुन्हा तीव्र आंदोलन सुरु करण्यात येईल व त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे बाबासाहेब पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज