विक्रांत पाटील । “तावशी “तालुक्याला पहिला आमदार देणार गाव राजकारणात महत्त्वाचा असणारे गाव महंमद पैलवान यांचं गाव वाळू साठी संघर्ष करणार गाव अशी अनेक लौकिक असणारे गाव म्हणजे पंढरपूर तालुक्यातील तावशी गाव परंतु गेले काही वर्षापासून तावशी गावात दारू मटका जुगार आणि आता त्यात भरीस भर वाळू तस्करी ने गावातील वातावरण बिघडून गेले आहे राजरोसपणे गावातील प्रतिष्ठित लोकांच्या छत्रछायेखाली अनेक लोकांचे संसार उध्वस्त करणारे व्यवसाय राजरोसपणे चालू आहेत हजारो रुपयांचा जुगार ठिकाणी चालू आहे.
पाच गावातील लोक दारू पिण्यासाठी तावशी गावचा रस्ता धरतात बाहेरचे येणारे तळीराम गावात भरपूर उच्छाद मांडून जातात .ना पोलिसांचे लक्ष न गावातील प्रतिष्ठित लोकांचे लक्ष त्यामुळे हे व्यवसाय करणारे चांगलीच फोफावले आहेत.
आज अनेकांचे संसार जुगार आणि दारू या गोष्टीमुळे उध्वस्त झालेले आहे आता नवीनच एक बिजनेस या गावांमध्ये चालू झालेला असून याकडे ग्रामसेवक तलाठी न कोतवाल यांचे लक्ष राहिलेलं नसुन बैलगाडी च्या माध्यमातून वाळू नदीपात्रातून बाहेर काढली जाते व रात्री बाहेरगावावरून चार चाकी वाहने बोलूवून वाळूची विक्री केली जाते तोंडावर सापडलेली वाहने गाडी जरी शासनाने जप्त केलेले असल्या तरी अजून सुद्धा वाळू तस्कर हा व्यवसाय सोडण्यास तयार नाही.
अनेक जण रातोरात पैसे कमवण्यासाठी कुठल्याही थराला जायला तयार झालेले आहेत दिवसभर बैलगाडीने बाळू बाहेर काढणे आणि रात्री गाडी भरून देणे हा एक नवीन बिजनेस चालू झाला आहे.यामुळे तावशी गावचे वैभव गमावण्याची शक्यता आहे.
तरी संबंधित वाळू तस्कर वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या जुगाराचा अड्डा चालणारे चालक दारू विक्रेते यांच्यावर कुठेतरी निर्बंध घालण्याची गरज आता सध्या येऊन ठेपले आहे.या व्यवसायांवर कुठेतरी निर्बंध द्यावेत हीच माफक अपेक्षा सामान्यातून होत आहे.
Illegal trade in pandharpur Tawshi village; The administration did not pay attention
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज