टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील वनविभागाच्या जागेत अवैध चंदन वृक्षतोड प्रकरणी रंगेहात पकडलेल्या आरोपी बापू अशोक बनसोडे ( लवय ३२ रा. फुलचिंचोली ता . पंढरपूर ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपीला मंगळवेढा येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एस.एन. गंगवाल-शाह यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची फॉरेस्ट कस्टडी सुनावली आहे.
दि.२९ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून मारापुर वनपरिक्षेत्र अवैध चंदन वृक्षाचा गाभा तोडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील वनकर्मचाऱ्यांना मिळाली.
त्यांनी घटनास्थळी जाऊन संशयित आरोपीस रंगेहात पकडून साहित्यही जप्त केले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तपास मंगळवेढ्याचे वनपाल एस. डी. बुरुंगले करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज