mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बेकायदा वाळू साठा पोलिस कर्मचार्‍यास भोवला; तहसीलदारांनी शेतजमीनीवर बोजा चढविण्याचे काढले आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
बेकायदा वाळू साठा पोलिस कर्मचार्‍यास भोवला; तहसीलदारांनी शेतजमीनीवर बोजा चढविण्याचे काढले आदेश


टीम मंगळवेढा टाईम्स । 


मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक गजानन पाटील ( रा. लक्ष्मी दहिवडी) यांनी 4 ब्रास बेकायदा वाळू साठा केल्याप्रकरणी तहसीलदार यांनी 1 लाख 56 हजार रुपये इतका दंड शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश पारित केले असतानाही ती रक्कम न भरल्याने तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी त्यांच्या 7/12 उतार्‍यावर त्या रकमेचा बोजा नोंद करण्याचे फर्मान संबंधीत तलाठयाला काढले आहे.


बैलगाडीतुन वाळू वाहतूक करणाऱ्यावरही कारवाई केली जाते.आता अतिरिक्त पाेलीस अधिक्षक अतुल झेंडे काय कारवाई करणार ? याकडे तमाम नागरीकांचे लक्ष लागून राहीले आहे.

लक्ष्मी दहिवडी येथील मूळ रहिवासी असलेले व मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक गजानन पाटील यांनी गावात 4 ब्रास अनधिकृत वाळूसाठा केला होता. याबाबतची तक्रार नागरिकांनी तहसीलदार यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी सदर गावच्या तलाठयांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पंचनामा व अहवालानुसार पाटील यांना 1 लाख 56 हजार इतका दंड महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) अन्वये करून दंडाची रक्कम शासकीय खजिन्यात जमा करण्याचे आदेश पारित केले होते.


 

या वाळूसाठयावर त्याच गावचे नागनाथ गुरव यांनीही हा साठा माझाच असल्याचा दावा केल्याने तहसीलदार यांनी दोघांनाही दंड भरण्याचे आदेश काढले होते. आदेशानंतर दिलेली मुदत संपल्याने पुन्हा नव्याने आदेश काढून आजतागायत दंडाची रक्कम जमा न केल्याने त्या दोघांच्या 7/12 उतार्‍यावर 1 लाख 56 हजार इतका बोजा नोंद करण्याचे आदेश सदर गावच्या तलाठयांना देवून या कामी दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेवून उतार्‍यावर नोंद केल्याचा अहवाल इकडील कार्यालयास सादर करावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

सदर पोलिस कर्मचार्‍याने जालना जिल्हयातील गोदावरी नदीतून  दि. 24/5/2019  रोजी वाळू आणल्याची पावती गौण खनिज विभागाकडे सादर केली आहे. मात्र लक्ष्मी दहिवडी येथील वाळू साठा हा जून महिन्यातील असल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. मागील एक वर्षापुर्वीच्या पावत्या जोडण्यात आल्याने महसूल अधिकार्‍यांनी त्या रिजेक्ट करून कारवाईचे फर्मान काढले आहे. 

दरम्यान या आदेशामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.सर्वसामान्य नागरिकांनी बैलगाडीने वाळू नेल्यास पोलिस प्रशासन चोरीचा गुन्हा दाखल करते तर महसूल विभाग दंडात्मक कारवाई करते. या पोलिस कर्मचार्‍याने खाकी वर्दीचा गैरवापर करत बेकायदा वाळू घेवून जाणार्‍या वाहनावर कारवाई करण्याऐवजी स्वतःच्या  फायदयासाठी त्याचा वापर केल्याची चर्चा  दहिवडी पंचक्रोशीतून होत आहे.

सोलापूर शहरातील एका पोलिस कर्मचार्‍याने वाळूच्या वाहनात भागिदारी केल्याने पोलिस आयुक्तांनी त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली. आता पोलिस अधिक्षक मनोज पाटील पोलिस आयुक्ताप्रमाणे या पोलिस कर्मचार्‍यावर कारवाई करणार की पाठीशी घालणार याकडे जिल्हयातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Illegal sand stocks surround police personnel;  Tehsildar orders to impose burden on agricultural land

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी mi स्टोर (रेडमी शॉपी) आता मंगळवेढा शहरात

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी mi स्टोर (रेडमी शॉपी) आता मंगळवेढा शहरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाचा मोठा विजय; मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारची घोषणा

August 26, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 26, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा