टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात दारूचे सेवन करून टाटा कंपनीचा चारचाकी टमटम चालवित असताना सदर चालक मिळून आल्याने मोटार वाहन अधिनियमानुसार चालक सागर अंबादास घाडगे (वय ३४, रा. भोसे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.१० जानेवारी रोजी ३.५३ वाजता मंगळवेढा शहरातील पंढरपूर रोडवर असलेल्या घाडगे कलेक्शनसमोर चालक सागर घाडगे हा त्याच्या ताब्यातील क्र. एमएच १३ डीक्यू ४३१६ हे टाटा कंपनीचे चारचाकी टमटम दारूचे सेवन करून
दारूच्या अमलाखाली चालवित असताना मिळून आल्याची फिर्याद सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार तानाजी मुदगूल
यांनी दिल्यावर सदर आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा अधिक तपास येथील वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार शिवाजी पांढरे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज