गुगल पे , पेटीएम आणि फोन-पे सह थर्ड पार्टी पेमेंट ऍपच्या माध्यमातून UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने थर्ड पार्टी ऍप प्रोव्हाडर्सवर 1 जानेवारी 2021 पासून 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. NPCI ने थर्ड पार्टी ऍप्सचे एकाधिकार संपुष्ठात आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, देशात प्रत्येक महिन्याला जवळपास 200 कोटी UPI ट्रान्झेक्शन होतात.
हे UPI ट्रान्झेक्शन विविध पेमेंट्स ऍप्सद्वारे होतात. येणाऱ्या काळात देशात UPI ट्रान्झेक्शनचा आकडा आणखी वाढणार आहे.
दरम्यान, UPI ट्रान्झेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे NPCI थर्ड पार्टी ऍपच्या ट्रान्झेक्शनवर लगाम लावण्याच्या प्रयत्नात आहे.
1 जानेवारीनंतर ऍप, टोटल वॉल्यूमच्या अधिकाधिक 30 टक्केच ट्रान्झेक्शन करू शकतील.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक पत्रक जारी करत सांगितलं की, थर्ड पार्टी ऍप प्रोव्हाडर्सवर 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भविष्यात कोणत्याही थर्ड पार्टी ऍपची मक्तेदारी रोखण्यासाठी आणि त्यांच्या आकारानुसार मिळणारे विशेष फायदे रोखण्यासाठी NPCI ने हा निर्णय घेतला आहे.
NPCI च्या या निर्णयामुळे कोणत्याही पेमेंट ऍपची यूपीआय व्यवहारांमध्ये मक्तेदारी राहणार नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज