टीम मंगळवेढा टाईम्स।
गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे मुख्य विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनादेखील आता वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.
यासाठी जीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान या विषयाची कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून एक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नुकतेच यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहे. त्यामुळे ऐनवेळी डॉक्टर होण्याचे ठरवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध झाली आहे.
डॉक्टर व्हायचे असेल तर अकरावी-बारावीत जीवशास्त्र अर्थात बायोलॉजी विषय असणे आतापर्यंत अनिवार्य होते. बायोलॉजी विषय असेल तरच विद्यार्थी एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठीच्या
१४ जून रोजी झालेल्या बैठकीत या मुद्दयावर विचारविनिमय करण्यात आल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सांगितले. यानंतर देशातील आणि परदेशातील वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी मापदंड शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय शिक्षण धोरणातदेखील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी लवचिकता दाखवली आहे.
नीट-यूजी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरत होता. परंतु वैद्यकीय आयोगाने केलेल्या बदलानुसार आता अकरावी, बारावीतील मुख्य अभ्यासक्रमात बायोलॉजी विषय नसलेल्या विद्यार्थ्यांनादेखील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. अशा विद्यार्थ्यांना बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी या विषयाची एक अतिरिक्त परीक्षा द्यावी लागेल.
यूजीसीची मान्यता असलेल्या कोणत्याही विद्यापीठातून ही परीक्षा देता येईल. ही
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय आयोग एक प्रमाणपत्र देईल. या प्रमाणपत्राच्या आधारावर हे विद्यार्थी देशातील तसेच परदेशातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देखील प्रवेश घेऊ शकतील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज