टीम मंगळवेढा टाईम्स।
ग्रामसुरक्षा यंत्रणेचा नागरिकांनी सक्षमपणे वापर केला तर परिसरातील चोरी व दरोड्यांना आळा बसू शकेल, असे प्रतिपादन ग्रामसुरक्षा यंत्रणा सोलापूरचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे यांनी केले.
सोलापूर ग्रामीण पोलिस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कुरूल येथे हनुमान मंदिरात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेविषयी पुस्तकाचे वितरण तसेच आपत्कालीन ग्रामसुरक्षा यंत्रणेविषयी जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी सतीश शिंदे, सरपंच चंद्रकला पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव, ग्रामविकास अधिकारी सुवर्णा घाटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष छत्रपती जाधव, माजी सरपंच ज्ञानोबा जाधव,
माणिक पाटील, संभाजी पाटील, बाळासाहेब लांडे, आनंद जाधव, प्रकाश जाधव, डॉ. कैलास जगताप, दगडू साळुंखे, बाबूराव पाटकर, विनोद आंबरे, विष्णुपंत जाधव, सज्जन जाधव, सुनील आंबरे, लक्ष्मण भालेराव,
संतोष जाधव, अमोल खंदारे, सुरेश कुंभार, खाजाभाई शेख, आशा वर्कर सुवर्णा शिंदे, लक्ष्मी माने, मालन कुंभार, रेणुका जाधव, पोलिस कॉन्स्टेबल संजय सावळे, पोलिस नाईक सोमनाथ कांबळे उपस्थित होते..
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज