टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ, फटेवाडी, भाळवणी या भागातुन महाराष्ट्र राज्य विद्युत परेशानच्या विद्युत वाहिनी गेलेल्या आहेत त्या तारेखालील झाडांचा मोबदला काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे.
काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही पंचनामे झाले पण जे शेतकरी 2018 पासून मोबदल्यापासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांसाठी प्रहार संघटना मैदानात उतरली आहे.
जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत या शेतकऱ्यांसाठी आ .बच्चू कडू यांची प्रहार संघटना शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
खोमनाळ येथील सरवदे हे शेतकरी गेली अनेक वर्षे झाले पारेशान यांच्या कार्यालयाला भेट देतात, पाठपुरावा करतात परंतु तेथील अधिकारी या शेतकऱ्यांना न्याय देत नाही त्यामुळे त्यांनी प्रहार संघटने कडे धाव घेतली.
त्यामुळे त्यांच्या पाठीशी प्रहार संघटना ठामपणे उभे आहे वेळ पडली तर पारेशांनची विद्युत वाहिनी बंद पाडू असे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
आता मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांना भेटून निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये आंदोलनाचा इशारा नुसता दिलेला आहे जर त्यांना पंधरा दिवसात न्याय नाही भेटला तर मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.
यावेळी बाधित शेतकरी विठ्ठल सरवदे, रावसाहेब बिले ,भाळवणीचे साखरे प्रहार चे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, तानाजी पवार यांनी निवेदन दिले आहे.
जर उपविभागीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले तर प्रहार चे अनोखे पुन्हा एकदा प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार चे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज