टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून उपेक्षित राहिलेल्या परंतु संताच्या पावन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यात तसे पाहिले तर आरोग्य सेवा पुरवणाऱ्या जेमतेम संस्था कार्यरत आहेत.
आता मंगळवेढा तालुक्यातील मानांकित व महिलांच्या आरोग्याबाबतच्या दर्जेदार सेवा पुरविण्यामुळे नावारूपाला आलेल्या महिला हॉस्पिटल,बोराळे नाका, विजयपूर रोड वरील नवीन भव्य इमारतीत काही मंगळवेढा तालुका व शहरी भागातील डॉक्टर एकत्र येऊन मंगळवेढा हेल्थ एलएलपी संचलित एक नवीन विविध विभागाचे हॉस्पिटल सुरू केले आहे.
महिला हॉस्पिटल चे रूपांतर आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये होत आहे यामध्ये अस्थीरोग, मेडिसिन,जनरल सर्जरी
बालरोग, यूरोलॉजी, डेंटल वगैरे अनेक विभाग सुरू असून अद्यावत असे आयसीयू(ICU) अतिदक्षता विभाग सुरू झालेला आहे.
महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी मंगळवेढा येथे सध्या मेडिसीन व यूरोलॉजी विभाग सुरू झाले असून डॉक्टर अविनाश सुरवसे हे एमडी मेडिसिन असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण सायन हॉस्पिटल मुंबई येथे झाले आहेत.
तर डॉक्टर शशिकांत आसबे एम एस जनरल सर्जरी व एमसीएच यूरोलॉजी असून वैद्यकीय शिक्षण पटियाला झाले असून मूत्ररोग संबधी सेवा देत आहेत.तसेच जनरल सर्जरी मधील अपेंडिक्स,हर्निया ,गर्भ पिशवी काढणे आदी विविध प्रकारच्या शस्त्रकीया चालू झाल्या आहेत.
विविध विभागातील आरोग्य सेवा देत असताना लागणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी,2D-इकोकार्डिओग्राफी सेवा सुरू झालेले असून एक्स-रे सिटीस्कॅन डायलिसिसच्या सेवाही त्वरित सुरू होत आहेत.
महिला हॉस्पिटलच्या नवीन इमारतीमध्ये सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध असून शास्त्रोक्त पद्धतीने बांधकाम आहे. उत्कृष्ट बांधकामासाठी महाराष्ट्रातील आर्किटेक इंजिनिअर आणि अल्ट्राटेक कंपनी मार्फत घेतलेल्या स्पर्धेत या इमारतीस नामांकनसुद्धा प्राप्त झाले आहे.
या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा, रुग्णाना ने-आण साठी रॅम्प,व लिफ्टची सोय आहे.काँफेरन्स हॉल, सीवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, लाईटनिंग प्रोटेक्टर, 24 तास आर ओ वॉटर सप्लाय, 24 तास अखंड वीज पुरवठ्यासाठी 125 कवीचा जनरेटरचे अशा सोयींनी युक्त आहे. मोड्युलर ऑपरेशन थिअटर सह अन्य दोन अद्यावत असे शस्त्रक्रिया ग्रह कार्यान्वित आहेत.
तसेच वातानुकूलित स्पेशल रूम, सुपर डीलक्स रूम सुद्धा उपलब्ध आहेत. मंगळवेढ्या सारख्या ग्रामीण भागात प्रोस्टेट किडनीचे विकार, हर्निया, अपेंडिक्स ,आतड्यांचे आजार, मुतखडा ,मूत्राशयाचे आजार विविध प्रकारच्या हाडांचे आजार व फॅक्चर हृदय विकार, उच्च रक्तदाब मधुमेह, अस्थमा, विषबाधा, सर्पदंश, कावीळ
आणि लिव्हरचे इतर आजार, बालरोग तज्ञाकडून बालकांचे अतिदक्षता विभागातील उपचार, डेंटल ( दाताचे आजार )वगैरे अनेक प्रकारच्या सेवा देण्यासाठी तसेच काही डॉक्टरांनी एकत्र येऊन अशाप्रकारचे सर्व जनतेला तातडीची आरोग्यसेवा, किफायतशीर शुल्कामध्ये, सोनोग्राफी,एक्स-रे, व सीटी स्कॅन आदी यंत्राच्या साहाय्याने देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथमच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वरील अनेक सेवा अगदी मोफत (नियम व अटीस अधीन राहून) सेवा देण्यात येत आहेत.
येत्या काळात अनेक तज्ञ डॉक्टरांना बोलवून हॉस्पिटलच्या सर्व विभागाच्या सेवा व सर्व स्त्री पुरुष ,लहान मुले व नवजात बालके यांच्या सुद्धा शस्त्रक्रिया मंगळवेढा ग्रामीण जनतेला उपलब्ध होणार असल्याने आता मंगळवेढाकराना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नसल्याचे चित्र निर्माण होत आहे.
डॉ.पुष्पांजली शिंदे ह्या स्त्री रोग तज्ञ व प्रसुती तज्ञ असून 7 नोव्हेंबर 2005 पासून मंगळवेढा शहरात महिलांच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्यांनी महिला हॉस्पिटल ची स्थापना की सुरू केली होती. ग्रामीणसह ,शहरातील अनेक महिलांना त्यांनी सेवा दिली आहे .प्रसूती बरोबर सोनोग्राफी केंद्रात व निवारण गर्भाशयाचे आजार व शस्त्रक्रिया सेवा त्यांनी दिलेल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यात अन्य भागातील अनेक रुग्ण मंगळवेढ्याला येऊ लागले आहेत सध्या महिला हॉस्पिटलची भव्य व अद्ययावत इमारत उभी राहिली असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने हॉस्पिटलला मिनी सिव्हील हॉस्पिटलचे स्वरूप आलेले आहे.
महिला हॉस्पिटल मंगळवेढा या ठिकाणी शेकडो प्रसूती आणि सिझेरियन शस्त्रक्रिया अगदी नि:शुल्क होत असून मंगळवेढ्याचा तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरातील पंढरपूर, सांगोला, जत मोहोळ तालुक्यातील शेकडो मातांनी मोफत प्रसूती अथवा सिझरेयन च्या सेवा घेतल्या आहेत.
यासाठी प्रसूतीच्या वेळेस येताना केवळ आधार कार्ड, रेशन कार्ड व लसीकरण कार्ड सादर करावे लागते या योजनेअंतर्गत दाखल झाले पासून सर्व तपासण्या, औषधे मोफत दिली जातात व शेवटी घरी जाण्याचे पैसेसुद्धा दिले जातात . ग्रामीण भागातील जनतेला कोरोना (covid-19) महामारी च्या काळात मोठा आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी स्वतःचे हॉस्पिटल सांभाळून अनेक डॉक्टरांनी एकत्र येऊन सर्व सुविधा या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करण्याचा हा मंगळवेढा तसा पहिला प्रयत्न असून विविध स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील नंदादीपाचे स्थान निर्माण केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज