टीम मंगळवेढा टाईम्स ।
आज 5 ऑक्टोबर 2023 रोजीपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होत आहे. या वनडे स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी आहेत. वर्ल्ड कपमध्ये एकूण 45 दिवसांमध्ये 48 सामने खेळवण्यात येणार आहेत. देशातील एकूण 10 शहरांमधील प्रसिद्ध स्टेडियममध्ये हे सामने आयोजित करण्यात आले आहेत.
वर्ल्ड कपनिमित्ताने सर्व स्टेडियमचं नवं रुप पाहायला मिळणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे तयारी केली आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा आणि अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या 2 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत.
आयसीसी विश्व चषक 2023 स्पर्धेत पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.
तर 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. सर्व खेळाडूंनी नेट्समध्ये खूप घाम गाळला आहे. एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सज्ज आहेत. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
एकूण 10 संघ
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत. या 10 संघांमध्ये यजमान टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि नेदरलँड्सचा समावेश आहे.
या 10 पैकी 8 संघांनी वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय केलं. तर श्रीलंका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघानी आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेतून तिकीट मिळवलं. नेदरलँड्स 12 वर्षानंतर वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली. नेदरलँड्सने अखेरचा वर्ल्ड कप हा भारतात 2011 साली खेळला होता.
10 टीम 10 कॅप्टन
टीम इंडियाचं कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळणार आहे. रोहितची वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून ही पहिलीच वेळ आहे. बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करेल. अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन बांगलादेशचं कर्णधारपद सांभाळणार आहे. हशमतुल्लाह शाहिदी अफगाणिस्ताची कॅप्टन्सी करेल. दासुन शनाका श्रीलंकेला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाची सूत्र पॅट कमिन्स याच्याकडे आहेत.
सर्व सामने हे टीव्हीवर..एपद्वारे पाहता येतील
वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलवर पाहायला मिळणार आहेत. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येणार आहे. तर मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपद्वारे सामने पाहता येतील. विशेष म्हणजे क्रिकेट चाहत्यांना यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.
सर्व सामने हे फुकटात पाहता येणार आहेत. याआधी हॉटस्टारवर मॅच पाहण्यासाठी खिसा रिकामा करायला लागयचा. मात्र आता वाढत्या स्पर्धेमुळे हॉटस्टारने सामने फुकटात दाखवण्याचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक आणि टीम इंडियाचे 15 शिलेदार कोण कोण आहेत, हे जाणून घेणार आहोत
टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई, 8 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, 11 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद, 14 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश, पुणे, 19 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाळा, 22 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, लखनऊ, 29 ऑक्टोबर.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, मुंबई, 2 नोव्हेंबर.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता, 5 नोव्हेंबर.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स, बंगळुरु, 12 नोव्हेंबर.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज