मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
काँग्रेसच्या खा.प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दुसऱ्यांची शिफारस केल्यामुळे मला माझा नियोजित पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ सोडावा लागला.
यामुळे माझी अडचण झाली आणि ऐनवेळी मला माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली, अशी स्पष्टोक्ती माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी केली.
शरद पवार गटाकडून येथील आयएमए हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील नूतन आमदारांचा सत्कार समारंभ झाला.
तसेच यावेळी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. सत्कारानंतर नूतन आमदारांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वीकारलेल्या भूमिकेवर टीका केली.
यावेळी मोहोळचे आमदार राजू खरे, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, प्रदेश प्रवक्ते अॅड. यू. एन. बेरिया, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, भारत जाधव, नलिनी चंदेले,
प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवती अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा चव्हाण, चंद्रकांत पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच माजी महापौर महेश कोठे हे उपस्थित नव्हते.
पाच ते सहा प्रभागांची जबाबदारी द्या
लवकरच महापालिकेची निवडणूक लागणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदारांना पालिका हद्दीतील पाच ते सहा प्रभागांची जबाबदारी द्या. आमदार ताकदीने प्रचार करतील. उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. शरद पवार गटाकडून पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढवू, असा इशाराही यावेळी आमदारांनी दिला.
भाजपच्या लोकांनी दिली साथ
मी पूर्वी शिवसैनिक होतो. त्यामुळे उद्धव ठाकरे सेना गट तसेच शिंदे सेना गटातील पदाधिकाऱ्यांची माझी चांगली दोस्ती आहे. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी मोहोळमधील भाजपच्याही लोकांनी मला साथ दिली. माझे काम केले.
तसेच शरद पवार यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते, म्हणून मी मोहोळमधून निवडून येऊ शकलो, अशी कबुली आमदार राजू खरे यांनी यावेळी दिली. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मोहोळमधून प्रणिती शिंदे यांना ६३ हजारांचा लीड मिळाला होता. त्या मोहोळ मतदारसंघात त्यांनी घड्याळाचे काम केल्याची टीकाही खरे यांनी यावेळी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज