मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथे बुधवार दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, प्लेसमेंट विभाग व आय सी आय सी आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आय.सी.आय. सी. आय. बँकेतील रिलेशन मॅनेजर (वरिष्ठ अधिकारी ) या पदाकरिता भरती होणार आहे.
तीनशे पेक्षा जास्त जागा
सदर भरतीमध्ये ३०० पेक्षा जास्त जागा असुन यामध्ये संत दामाजी महाविद्यालयाकडून आपणांस मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वार्षिक पॅकेज
या मुलाखती दरम्यान ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना वार्षिक पॅकेज दोन लाख तीस हजार ते दोन लाख पंच्याऐंशी हजार पर्यंतचे असणार आहे.
कोणत्याही शाखेची पदवी
यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी नोकरी करण्याची तयारी हवी. या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता कोणत्याही शाखेची पदवी
किमान ५० टक्के गुण आवश्यक
तसेच वय वर्षे १८ ते २५ त्याचबरोबर दहावी, बारावी आणि पदवीला किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे.
मुलाखत व अभियोग्यता चाचणी
या पदासाठीची निवड प्रक्रिया निबंध चाचणी, सायको मॅट्रिक चाचणी, मुलाखत व अभियोग्यता चाचणी असे स्वरूप असणार आहे
तरी जास्तीत जास्त विद्यार्थांनी या नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एन.बी. पवार यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज