मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
विजयादशमी दसऱ्याचा कालचा दिवस विविध ठिकाणच्या दसरा मेळाव्यांनी गाजत होता सारवगाव येथे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे आणि पकंजामुंडेंनी जातीवादावर प्रहार करत भाषण जागवले.
त्यानंतर, नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही मराठा समाजाला उद्देशून भाषण केलं. तत्पूर्वी नारायण गडावर जाऊन त्यांनी दर्शन घेतले.
यावेळी, त्यांच्या डोळ्यातून अश्रूतरळल्याचं दिसून आलं. जरांगे पाटील रुग्णालयातून या दसरा मेळाव्यासाठी खास नारायण गडावर आले होते. त्यामुळे, आजारपणातच त्यांनी जोरकसपणे भाषण केले.
विराट संख्येनं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय.. असे म्हणत जरांगे पाटील यांनी नारायण गडावरुन आपल्या भाषणाला सुरुवात केली.
मायबापहो… मला बोलायला लई त्रास होतोय, आपला गड नगद आहे म्हणून बोलायला ताकद मिळतेय. जशी मला मिळाली, तशी माझ्याशेतकऱ्याला पण मिळेल. लई वेदना आहेत, शरिराला त्रास आहे.
मी 5-6 महिन्यांपूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की, मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी भावनिक भाषण केलं. त्यावेळी, नारायण गडावरील वातावरण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, जरांगेपाटलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रूतरळले होते. तरीही, जरांगे पाटील यांनी उपस्थित आणि मराठा समाजाला उद्देशून भाषण केलं.
दसऱ्याच्या निमित्ताने सांगतो, जातीला सांभाळायचं असेल तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासकही बनावंही लागेल. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनापुढे उभं राहावं लागतं,
तुमच्या पोरांना तहसीलदार, PSI, कलेक्टर बनवा. तुमचं पोरगं-पोरगी तहसीलदार, PSI, कलेक्टर बनवा. अधिकारी बनवा. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरु गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईल.
सगळे बोगस लोकं जाऊन तिथे बसलेत, बोगस आरक्षण घेतलेले बसलेत बोगस, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर जाण्याचं आवाहन केलंय. तसेच, मराठा आरक्षण ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामाला लागा, प्रमाणपत्र काढून घ्या, असेही पाटील यांनी सांगितले.
मला ताकद मिळाली तशी शेतकऱ्यांना मिळावी
मनोज जरांगे पाटील म्हणाले, गड नगद आहे म्हणून ताकद मिळते, मला ताकद मिळाली तशी शेतकऱ्यांना मिळावी. ते पुढे म्हणाले की, मी थोड्या दिवसाचा पाहुणा असल्याचे सांगितले होते. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं पाहायचं आहे असल्याचे ते म्हणाले. तुम्ही दिलेल्या साथीमुळे 75 वर्षात न जिंकलेली लढाई जिंकली असून 58 लाख नोंदी सापडून 3 कोटी समाजात आरक्षणात गेला आहे. एका वर्षात सातारा हैदराबाद गॅझेट मिळवलं असल्याचे त्यांनी सांगितले.
काही पांढरे कपडे घालून गाड्या घेऊ फिरले
जरांगे पाटील म्हणाले की, मला जीवनात येऊन सिद्ध करायचं होतं ते केलं आहे. मी कधीही समाजासाठी खोटं बोललो नाही, नाटक केलं नाही. मात्र, काही वेळा एक पाऊल मागे, एक पाऊल पुढे गेलो. हे सांगताना मनोज जरांगे भावूक झाल्याचे दिसून आले.
ते म्हणाले की, मराठा समाजाची तडफड दिसत होती. त्यामुळे शेतीबरोबर आरक्षणाचा आधार गरजेचा वाटला. आपण हैदराबाद आणि सातारा गॅझेट मिळवून आरक्षण मिळवलं आहे. जीवनात मिळवायचं होतं ते मिळवलं आहे. काही पांढरे कपडे घालून गाड्या घेऊन फिरले, यातच मर्दानगी गाजवली असल्याचा टोला त्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज