टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील कपडे शिलाईचा व्यवसाय करणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेला तीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायलर करण्याची धमकी देवून तीचा विनयभंग केल्याप्रकरणी साईनाथ शिंदे याच्याविरूध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , दि.२३ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० च्या सुमारास सदर महिला ही तीच्या शेतातून घरी परतत येत असताना तीच्या घरामागे राहणारा साईनाथ परमेश्वर शिंदे हा मारुतीच्या देवळासमोरील चौकात आला व त्याने तीच्या अंगावर जावून शिवीगाळ केली.
तसेच तु कोणाबरोबर फिरती, काय करती हे मला माहिती आहे,तु त्यांचेसोबत फिरू नको अन्यथा मी तुझे अंघोळ करतानाचे रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सर्वांना दाखवेन तसेच तु माझ्याबरोबर शारिरिक संबंध ठेव असे सर्व लोकादेखत म्हणून तीच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन केले.
अशा प्रकारची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दिल्यानंतर सदर आरोपीविरूध्द भा.दं.वि.स कलम ३५४ (अ),(१) (२),३५४ (क), ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.याचा अधिक तपास शहानूर फकिर हे करीत आहेत.
Mangalwedha hunnur Woman threatened to go viral while bathing video
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज