मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरात रविवारी 106 रुग्णांची भर पडली असून मृतांमध्ये चारजण वाढले आहेत. आता शहरातील एकूण रुग्णसंख्या 2 हजार 688 झाली असून मृतांची संख्या 271 झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृतांची संख्या सोलापुरात राज्यात अव्वलच आहे. ( Solapur city corona virus updated )
सोलापुरात रविवारी विद्याविहार सोसायटी (उत्तर सदर बझार), राजस्व नगर (बाळे), प्रभा अर्पाटमेंट (होटगी रोड), कोणार्क नगर, गणेश बिल्डर (जुळे सोलापूर), स्वामी विवेकानंद नगरात प्रत्येकी एक, विद्या नगरात दोन तर महर्षि गौतम नगरात दोन, बनशंकरी नगरात एक (शेळगी), कुचन नगर (दाजी पेठ), पश्चिम मंगळवार पेठेत सहा रुग्ण सापडले आहेत. तसेच दत्त नगरात दोन (तुळजापूर रोड), शाहीर वस्तीत पाच, मराठा वस्तीत एक (भवानी पेठ), बाल शिवयोगी नगर, पार्वती नगरात प्रत्येकी एक रुग्णांची भर पडली आहे.
चाटी गल्लीत एक, नई जिंदगीतील सिध्देश्वर नगरात एक, अभिषेक नगरात एक, साखर पेठेत सहा, भारतरत्न इंदिरा नगरात चार, सांगेनगरात दोन (बाळे), न्यू बुधवार पेठेत एक, मजरेवाडीतील टिळक नगरात एक, वैष्णवी नगरात दोन, विशाल नगर, उत्तर सदर बझार, शास्त्री नगर, भवानी पेठ, मुरारजी पेठ, नवी पेठ, शुक्रवार पेठ, इंदिरा नगर, सिध्देश्वर पेठ, कविता नगर, न्यू पाच्छा पेठ, विजया नगर, माजी सैनिक नगर, प्रताप नगर येथे प्रत्येकी एक रुग्ण ,बुधले गल्ली, वृंदावन सोसायटी, रेल्वे पोर्टर चाळ, आरटीओ ऑफीसजवळ, देशमुख-पाटील वस्ती व विजय देशमुख नगर, अशोक नगरात प्रत्येकी एक, मुक्ती नगरात तीन (विजयपूर रोड),
विडी घरकूल, यश नगर, उमा नगरी येथे प्रत्येकी तीन, तुळजाभवानी नगरात पाच (अक्कलकोट रोड), सिंधु विहारमध्ये दोन, रुबी नगरात एक (जुळे सोलापूर), नरसिंह नगर, मोदी येथे दोन, वसंत विहार (जुना पुना नाका), नर्मदा अर्पाटमेंट (रेल्वे लाईन), साई विहार (कुमठा नाका) येथे पाच, ईएसआय हॉस्पिटल येथे दोन, जुनी पोलिस लाईनमध्ये एक (वसंत विहार), आंबेडकर नगररात दोन, लक्ष्मी पेठ व करले गल्ली, पिंजार गल्ली (देगाव) येथे प्रत्येकी दोन सापडले आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज