मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दहावीचा भूगोल विषयाचा पेपर आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याने महाविद्यालयीन परीक्षाही रद्द झाल्या अशा प्रकारचे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालं आहे. यावर कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला नाही. यासाठी चार कुलगुरुंची कमिटी केलेली आहे. या कमिटीतून जी शिफारस येईल त्यानंतर यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
अगदीच ‘कोरोना’मुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर भविष्यातील परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल. मात्र सध्यातरी कुठल्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार आहेत, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान,कोरोना’मुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला एसएससीच्या विद्यार्थ्यांचा दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात काल घोषणा केली.
—————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज