mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मद्यप्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी; मद्यविक्रीबाबत उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 11, 2021
in राज्य
मद्यप्रेमींसाठी अत्यंत महत्वाची बातमी; मद्यविक्रीबाबत उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पुण्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने येत्या तीस एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले आहेत. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडक टाळेबंदी असणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे.ग्राहकांना हॉटेल आणि बार मध्ये जाऊन पदार्थ घेण्यास मनाई आहे.

त्यांना ई- कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविता येतील. मद्य विक्री दुकानांना अ‍ॅपद्वारे तसेच घरपोच सुविधेद्वारे सेवा देत येईल. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत घरपोच सेवा देता येईल.

नियमानुसार मद्य विक्री ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून देता येणार नाही. घरपोच मद्य सेवा देण्यात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मागच्या वर्षी अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे मद्य दुकाने मद्यप्रेमींना बंद झाली होती. तब्बल दीड एक महिना सर्व दुकाने बंद होती. त्याचा मद्यप्रेमींना झटका आणि सरकारला चांगलाच फटका बसला होता.

मे महिन्यात परत दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला.आणि त्यानंतर कोरोनाचा विसर पडल्यागत नागरिकांनी दुकानांसमोर अक्षरश : भल्या मोठ्या रांगा लावत मद्याची खरेदी केली होती. मद्यप्रेमींनी त्यावेळी राज्य सरकारच्या महसुलात भरीव योगदान दिले होते.

त्यामुळे यावेळी लॉकडाऊन करताना राज्य सरकारने ऑनलाईन मद्य विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.मात्र यात आता मद्य विक्रेत्यांची कसरत होणार असून त्यांना घरपोच मद्यविक्रीसाठी यंत्रणा उभारावी लागणार आहे.

बार आणि वाईन्स शॉपला घरपोच सेवा देता येणार आहे. मात्र त्यासाठीची यंत्रणा त्यांना स्वतःलाच उभारावी लागेल. शिवाय त्यासाठी केवळ त्यांच्याच कामगारांची नेमणूक करावी लागेल. ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांचा उपयोग त्यांना करता येणार नाही.

ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून मद्य पुरविता येत नाही. त्यांना घरपोच सेवा स्वतः उभारावी लागेल. कमी मनुष्यबळात हे काम अवघड आहे. तसेच, बार चालकांनी छापील किंमतीवर मद्य विकल्यास त्यांना परवडणार नाही.

कारण त्यांना मद्यावर मूल्यवर्धित कर भरावा लागतो. बार चालकांनी उन्हाळ्यासाठी बीअरचा अधिक साठा ठेवला होता. बीअर सहा महिन्यात खराब होते. त्यामुळे बीअर विक्रीवर बारचालकांचा अधिक भर असेल. गणेश शेट्टी, अध्यक्ष, पूना हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार असोसिएशन

उत्पादन शुल्क विभागाबरोबर वाईन्स शॉप चालकांचा नोकरनामा असतो. अशा नोंदणीकृत व्यक्तिंच्या माध्यमातून घरपोच सेवा द्यावी लागेल.

शिवाय ग्राहकांपर्यंत दुकानाचा मोबाईल क्रमांक कसा पोचवायचा, कमी मनयुष्यबळामध्ये मालाचा पुरवठा कसा करणार? दुकान उघडल्या शिवाय मद्य पुरवठा करता येणार नाही. उत्पादनशुल्क विभागाकडून त्याबाबतचे स्पष्ट आदेश हवेत. अजय देशमुख, सचिव, पुणे डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंट असोसिएशन

ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनी मार्फत मद्य पुरवठा करता येणार नाही. दुकानाबाहेर मोबाईल क्रमांक द्यावा. त्या माध्यमातून मागणी नोंदवून घरपोच पुरवठा करावा. या पूर्वी घरपोच सेवेबाबत दिलेली नियमावली कायम आहे. संतोष झगडे, अधीक्षक, उत्पादनशुल्क, पुणे

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दारू विक्री

संबंधित बातम्या

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

March 21, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पत्नी पोलीस दलात स्वत: एसआरपीएफ, जवानाने स्वत:लाच संपवलं, दोन चिमुकल्यांचा आधार हिरावला; सोलापूर जिल्हा हादरला

March 15, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मुलींच्या मोफत शिक्षणात अडथळा? मंत्र्यांनी बजावला इशारा; होणार कारवाई; मुलींच्या शुल्काची लूट थांबणार; विधानसभेत मोठी घोषणा

March 15, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
सांगोल्यात धमकी देत मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर; काय आहे नेमकं प्रकरण?

March 14, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
Next Post

व्यापाऱ्यांसाठी एक न्याय आणि राजकीय नेत्यांच्या प्रचार सभेसाठी एक न्याय; शैला गोडसे संतापल्या

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेच्या दिवशीच राडा! शेताच्या जुन्या वादातून सासू-सुनेला काठीने केली बेदम मारहाण; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 22, 2026
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

लव्ह मॅरेजची चर्चा! बेपत्ता तरुणीचा शोध लागला; प्रियकराशी विवाह करून थेट मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर, वडिलांच्या जागी पतीला दिले प्राधान्य

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा