मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या पुढाकारातून माणुसकीचे घर हा उपक्रम लोकसहभागातून राबवण्यात आला. यामध्ये शहरातील २९८ गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नगरपालिकेला दीडशे वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने २०२३ – २४ हे वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने पालिकेने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यातच मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी माणुसकीचे घर हा नवीन उपक्रम शहरातील दानशूर व्यक्ती, व्यापारी यांच्या माध्यमातून संसार उपयोगी साहित्याचे संकलन करण्यात आले. त्यामध्ये शहरातील कापड व्यापारी, दुकानदार, प्रतिष्ठित नागरिक यांनी चांगले वापरायोग्य कपडे, साड्या, भांडी, चप्पल आधी प्रकारचे साहित्य नगरपालिकेच्या संकलन विभागाकडे जमा केले.
त्या जमा झालेल्या साहित्याचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील शनिवार पेठ व ग्रामीण रुग्णालयात शेजारील झोपडपट्टीतील गोरगरीब लहान मुलाच्या व महिलांच्या चेहऱ्यावर या वस्तू घेताना आनंद जाणवला.
यासाठी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी विनायक साळुंखे, लेखापाल सोमनाथ सरवदे, राम पवार, विठ्ठल कांबळे, बाबासाहेब पवार, गणपत माळी, गणेश वस्त्रे, सतीश जाधव, अमोल खवतोडे, विशाल साखरे, राजू पाटील, ओंकार मुढे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
तर शिवपार्वती कलेक्शन, अनिमिका क्लॉथ सेंटर, खटावकर मार्ट, जयभवानी नवरात्र मंडळ, शांतिनिकेतन क्लॉथ सेंटर, छाया फुट वेअर, सुभाष फुट वेअर यासह शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी यामध्ये सहभाग घेतला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज