टीम मंगळवेढा टाईम्स । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बर्याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांना पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. ( Home minister Amit Shah re-admitted to AIIMS )
गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, उपचारानंतर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
मात्र, आता पुन्हा श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री ११ वाजता अमित शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमित शहा यांना श्वास घेताना त्रास जाणवत आहे. अमित शहा यांनी काही काळ रुग्णालयात राहावे.
रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली चांगले उपचार होतील, असे एम्समधील एका सूत्राने सांगितले. दरम्यान, अमित शाह यांना एम्समधील कार्डियो न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, याआधी अमित शहा यांना १८ ऑगस्टला नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली अमित शहा यांच्यावर उपचार सुरु होते. ताप आला होता, त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
दोन आठवड्यात दुसऱ्यांदा ‘एम्स’मध्ये अॅडमिट
थकवा आणि अंगदुखी ही पोस्ट कोव्हिड लक्षणे दिसल्याने अमित शाहांना 18 ऑगस्टला ‘एम्स’मध्ये अॅडमिट करण्यात आले होते. जवळपास दोन आठवड्यांच्या उपचारानंतर शाह यांना 31 ऑगस्टला घरी सोडण्यात आले.
त्याआधी, अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली. अमित शाह यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमित शाह यांनी 14 ऑगस्टला स्वत: ट्विटरवर माहिती देत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले.
(Home minister Amit Shah re-admitted to AIIMS)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज