टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यात छत्रपती शिवरायांच्या लढाईचा इतिहास सांगणाऱ्या घटनांचा उजाळा शालेय विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या पुढाकाराने इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना पावनखिंड हा चित्रपटाचा सायंकाळ शो न्यु भारत चित्रपटगृहात दाखविण्यात आला.
कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे सार्वजनिक कार्यक्रम व गर्दी होणाऱ्या ठिकाणावर बंदी घालण्यात आली होती त्यामुळे पर्यायाने चित्रपट व्यवसाय देखील आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आला होता.
चित्रपटग्रह चालवणारे व त्यावर अवलंबून असणाय्रा अनेकांना बेरोजगार व्हावे लागले परंतु साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आणि सभा व सार्वजनिक कार्यक्रमाला शासनाने नियमाच्या अधीन राहून परवानगी दिली त्यामुळे चित्रपटगृहे नुकतेच सुरू झाली.
परंतु चित्रपटगृहापासून दुरावलेल्या प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाकडे वळवण्यासाठी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती, प्रेक्षक पुन्हा वळवणे हे मोठे आव्हान आहे.
त्याच दृष्टीने सोळाव्या शतकात पन्हाळगडापासून ते विशाळगडापर्यंत पोहचेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात मैलाचा दगड ठरलेल्या पावनखिंडीचा इतिहास विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानातून माहिती होता.
तो इतिहास त्यापुरता मर्यादित न राहता त्यापेक्षा आणखीन माहिती देण्याच्या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.
या चित्रपटाचा शो खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या पुढाकारातून इंग्लिश स्कूल मधील 280 विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.
यावेळी उद्योजक शैलेश अवताडे, मेजर मुरलीधर घुले, दयानंद दत्तू, रामचंद्र दत्तू ,विशाल जाधव,राज डोके, सतीश सावंत, दयानंद दसाडे, विजय गवळी, अमीर मुलांनी, सुनील नागणे, रवी पवार आदी सह उपस्थित होते.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज