टीम मंगळवेढा टाईम्स । देशात उभारण्यात येत असलेल्या २२ ग्रीन हायवेजना लागून हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाला दिला असून त्यात दिल्ली – मुंबई , मुंबई – नागपूर हायस्पीड ट्रेनचा समावेश आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी लोकमतला ही माहिती दिली . मध्यंतरी मी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीची बैठक घेतली. त्यात रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना प्रस्ताव दिला. त्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.
लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे गडकरी म्हणाले . ग्रीन हायवेजसाठी आम्ही आधीच | भूसंपादन करीत आहोत , त्यामुळे हायस्पीड ट्रेन वा अन्य सुविधांसाठी वेगळे भूसंपादन करावे लागणार नाही आणि पैशांचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल ,असे त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या टण्यातील सात मार्ग असे असतील
१.दिल्ली – नोएडा – आग्रा लखनौ – वाराणसी २. दिल्ली – जयपूर – उदयपूर अहमदाबाद ३. मुंबई – औरंगाबाद – नाशिक – नागपूर ४. मुंबई – पुणे – हैदराबाद ५. चेन्नई – बंगलोर – म्हैसूर ६. दिल्ली – चंडिगड – लुधियाना जालंधर – अमृतसर ७. हावडा – पाटणा – नवी दिल्ली.
High speed train will run along Green Highway including Delhi-Mumbai, Mumbai-Nagpur
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज