मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर येथील विमानतळ परिसरामध्ये भीषण आग लागली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान या आगीमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी त्यासंबंधीचं वृत्तही समोर आलं होतं. आता या विमानतळ परिसरात भीषण आग लागली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी सात ते आठ गाड्या पुरेशा नाहीत. मात्र तरीही अग्निशमन दलाकडून या ठिकाणी आणखी गाड्या पाठवण्याची खबरदारी घेतली गेली आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.
आता या विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत आहेत. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच नुकसानही झालेले नाही. मात्र या समस्येकडे आणि विमानतळ परिसराकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष देणं गरजेचं आहे अशी मागणी सोलापूरकरांकडून केली जाते आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज