मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
मुंबईत सलग पाऊस नसला तरी अधून मधून मुसधार सरी सुरू आहेत. मात्र दमट हवामानामुळे मुंबईत खूप जास्त उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर उपनगरात पावसाने जोर धरला आहे. राज्यात पुढचे चार दिवस हवामानाची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया.
के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. सोलापूर, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा त्यांनी इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आज कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस राहू शकतो. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज यलो अलर्ट तर विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मान्सून हंगाम सुरू झाल्या पासून राज्यात पहिल्यांदाज १६ जुलै रोजी सामन्य पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकण आणि विदर्भ प्रथमच सामान्य श्रेणीत आले आहेत.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अजूनही सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र या आठवडाभरात हा पण बदल होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज