mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरमधील तरुण सरपंचाची थेट मुख्यमंत्र्यांकडून दखल; काय आहे अंत्रोळी,घाटणेचा कोरोनामुक्ती पॅटर्न?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 31, 2021
in सोलापूर, राज्य
शेतकऱ्यांना दिवाळी गोड जाणार! अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई थेट खात्यात पैसे जमा होणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधत आता प्रत्येक गावाने कोरोनामुक्तीसाठी मोहिम सुरू करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील घाटणे (ता.मोहोळ) गावचे तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांचाही उल्लेख केला.

हे तरुण आपलं गाव कोरोनामुक्त करु शकतात तर आपण का नाही? असा प्रश्न करत त्यांनी राज्यातील सर्व गावांना कोरोनामुक्तीची मोहिम हाती घेण्याचं आवाहन केलंय. तसेच मी स्वतः पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांच्याशी बोलणार असल्याचंही नमूद केलं.

यानंतर आता या गावांविषयी अनेकांना उत्सुकता निर्माण झालीय. चला तर मग पाहुया काय आहे घाटणेचा कोरोनामुक्ती पॅटर्न घाटणेचे सरपंच ऋतुराज घाटणे हे सोलापूरमधील सर्वात तरुण सरपंच आहेत. घाटणे येथे मार्चपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता.

मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला अन्‌ तेथून दररोज कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र करत “बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह” ही मोहीम जिल्ह्यातील सर्वांत तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी हाती घेतली.

याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली अन्‌ आज गाव कोरोनामुक्त झाले आहे.

आगळीवेगळी “बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह” मोहीम

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्वांत तरुण सरपंच म्हणून ऋतुराज देशमुख (वय 21) यांची घाटणेच्या (ता. मोहोळ) सरपंचपदी निवड झाली आहे. सरपंचपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर ऋतुराज यांनी गावाच्या विकासासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या असून, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी जमा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले.

मात्र, यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने काही प्रमाणात अडथळा आणला आहे. मार्चपर्यंत घाटणेमध्ये एकही कोरोनाबाधित नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाची ही लाट थोपवून गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराज यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि सुरू झाली एक आगळीवेगळी “बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह” ही मोहीम.

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आज घाटणे गाव कोरोनामुक्त झाले असल्याचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी सांगितले.

कोरोनामुक्तीसाठी गावात पंचसूत्री राबवली

“घाटणे ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणून तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी ही तळमळ आहे. आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन देशमुख यांनी ग्रामस्थांना केले.

या आवाहनाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद आणि कोरोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर आपण गाव कोरोनामुक्त करू शकतो, असेही देशमुख म्हणाले.

मोहिमेनुसार गावात करण्यात आलेल्या उपाययोजना

गावातील जी मंडळी शहरात जातात किंवा लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसायात असतात, त्यांच्या आवश्‍यकतेनुसार रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या गावातील 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतले गावात घरोघरी जाऊन आशा ताईंच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी केली जात असून त्यात त्याची ऑक्‍सिजन लेव्हल, तापमान चेक केले जाते

प्रत्येक कुटुंबाला एक “कोरोना सेफ्टी किट” दिले असून त्यात व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण उपलब्ध बाहेर गावातून राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने तीन दिवस क्वारंटाइन करून या माध्यमातून कोरोनाची चेन ब्रेक करण्याचा केला प्रयत्न सगळ्या मोहिमेत गरजेनुसार गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष किंवा मिनी कोव्हिड सेंटर जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून सुरू करण्याचा

यापुढे विचार करोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर गाव कोरोनामुक्त केले. गावात कोरोनाने दोन मृत्यू झाल्यानंतर लोकं वाड्या-वस्त्यांवर राहण्यासाठी जाऊ लागली.

इतके भीतीचे वातावरण कोरोनामुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले होते. मात्र, ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केल्यानंतर पुन्हा एकदा वाड्या-वस्त्यांवर राहण्यासाठी गेलेले ग्रामस्थ गावात राहण्यासाठी येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील कोमल करपे या युवा सरपंचांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. कोण आहेत कोमल करपे?

कोमल करपे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावच्या सरपंच असून वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी सरपंचपद भूषविले. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरुन अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी विजय मिळवला. बी.एस.सी. बॅटनी या विषयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना राजकारणात संधी मिळाली आहे. कोरोना काळात गाव कोरोनामुक्त केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं. अंत्रोळी गावची लोकसंख्या 2 हजार 298 इतकी आहे

2 हजार 298 पैकी 300 लोकांचे लसीकरण पूर्ण झालं असून गावात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीद्वारे गाव केले कोरोनामुक्त.

गावातील लोकांना विश्वासात घेऊन प्रसंगी त्यांना कायद्याचा धाक दाखवून गाव कोरोनामुक्त केलं आहे. गावकऱ्यांच्या मदतीने आणि त्यांना विश्वासात घेऊन गाव कोरोनामुक्त करण्यात आलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसोलापूर

संबंधित बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना वारकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

July 3, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

याद राखा..! शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांवर सरकार करणार आता ‘ही’ कडक कारवाई; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा

July 3, 2025
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सायबरतज्ज्ञांनी भर सभागृहात सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याचा मोबाइल केला ‘हॅक’; दक्षता कशी जाणून घ्या…

July 2, 2025
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भयानक! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाला अपहरण करून संपवलं; मृतदेह आडरानात फेकला; नेमके घडले काय?

July 2, 2025

ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्याचा खर्च 70 टक्के कमी होणार

July 2, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

डोळे पाणावले! मुलीच्या लेकाने केला वारीचा हट्ट; आजीसमोरच नातू नदीत वाहून गेला; मृतदेह शोधासाठी वारकऱ्यांचा रास्ता रोको

July 2, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

July 1, 2025
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रेशन दुकानांचा जाहीरनामा; महिला बचत गट, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार; इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा

July 1, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणासाठी ‘या’ महिन्यात मुंबई गाठणार, ३ कोटी मराठा बांधव मोर्चाला जाणार; आंदोलकाला धक्का लागला तर…; मनोज जरांगे पाटीलांनी सांगितला ‘बी प्लॅन’

June 30, 2025
Next Post
धक्कादायक! मंगळवेढ्यातील आश्रमशाळेमधील ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण

पालकांनो! 'या' जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट, 8 हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह; लहान मुलांवर कोरोनाचं सावट

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

रतनचंद शहा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता? १५ जागांसाठी ‘या’ उमेदवारांचे अर्ज झाले मंजूर

July 3, 2025
चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

हृदयविकारामुळे मृत्यूचा ‘या’ लसीशी कोणताही संबंध नाही; अचानक ‘हार्ट ॲटॅक’ मागे अनेक कारणे; केंद्र सरकार दिले स्पष्टीकरण

July 3, 2025
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना वारकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या

July 3, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

याद राखा..! शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांवर सरकार करणार आता ‘ही’ कडक कारवाई; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा

July 3, 2025
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सायबरतज्ज्ञांनी भर सभागृहात सोलापूर जिल्ह्यात अधिकाऱ्याचा मोबाइल केला ‘हॅक’; दक्षता कशी जाणून घ्या…

July 2, 2025
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भयानक! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाला अपहरण करून संपवलं; मृतदेह आडरानात फेकला; नेमके घडले काय?

July 2, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा