मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम हाती घेतले होते.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमासोबतच ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा ) आजपासून मंगळवारपर्यंत राबविला जाणार आहे.
या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ७ ऑगस्ट रोजीच गटविकास अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
गेल्या वर्षी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत नागरिकांना ध्वज व्यवस्थित जतन करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ते ध्वज परत वापरू शकतील.
गरजेप्रमाणे तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर शिल्लक तिरंगा ध्वजाची स्टॉकमधून सॉर्टिंग करून चांगले झेंडे ग्रामपंचायतींना वितरित करावेत. गरजेप्रमाणे स्थानिक स्तरावरून महिला बचत गट, विक्रेते यांच्याकडून तिरंगा झेंडे उपलब्ध करून घेऊन हर घर तिरंगा उपक्रमाची नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी तालुकास्तरावर गट तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या अभियानाचे उपक्रम, माहिती, फोटो, सेल्फी तालुका नोडल अधिकारी यांच्या लॉगिनमधून पोर्टलवर भरणे आवश्यक आहे.
मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत विविध उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन करून हा उपक्रम राबविण्यासाठी देखील तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज