टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
राज्य मंडळातर्फे ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत बारावीच्या लेखी परीक्षा घेतल्या जातील. तत्पूर्वी श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होतील.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयात परीक्षेची संधी उपलब्ध केली आहे. मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर आज दुपारी एकपासून हॉल तिकीट कॉलेज लॉगिनमधून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील.
शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉल तिकिटाची प्रिंटआऊट काढावी.हॉल तिकिटाची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी,
तसेच हॉल तिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्याची दुरुस्ती शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावयची आहे, अशा सूचना मंडळाने मुख्याध्यापक व प्राचार्यांना केल्या आहेत.
विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास त्याला दुय्यम प्रत देऊन त्यावर लाल शाईने शेरा मारावा, फोटो सदोष असल्यास हॉल तिकीटवर नवीन फोटो चिकटवून
संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची असल्याच्या सूचना राज्य मंडळाकडून मुख्याध्यापक व प्राचार्यांना केल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज