कोरोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ‘या’ दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
टीम मंगळवेढा टाईम्स ।
निसर्गाचा समतोल बिघडल्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मंगळवेढा तालुक्यात अनेक ठिकाणी मंगळवारी सायंकाळी गारपीट झाली. शेतात आणि रस्त्यांवरही गारांचा खच पडला होता.
आधीच करोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मंगळवेढा तालुक्याती काही भागात मंगळवारी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या.
यामुळे डाळिंब, गहू, हरभरा, भाजीपाल्यासह आंब्याचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे शेतीचही मोठे नुकसान झाले, तर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी सुमारे अर्धातास गारांचा पाऊस सुरू होता. हरभऱ्याच्या आकाराएवढ्या गारा बरसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मंगळवेढ्यात गारपीट; पिकांचे मोठे नुकसान@Info_Solapur @SpSolapurRural @dadajibhuse @bharanemamaNCP pic.twitter.com/nDt9C09tad
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) April 13, 2021
सध्या अनेक ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहर वादळ आणि गारांमुळे गळून पडला आहे. डाळींब, द्राक्ष या पिकांचेही नुकसान झाले. गेल्या वर्षी अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले होते, त्याची नुकसानभारपाईही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. त्यातच आता पुन्हा नव्याने नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला शेतीनेच तारल्याचे आढळून आले. असे असले तरी या काळात शेतीवर अनेक नैसर्गिक संकटे येऊन गेली. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी आणि आता गारपीट यामुळे शेतीचे प्रत्येक हंगामात मोठे नुकसान होत आले आहे.
कोरोनाच्या संकटाकडे दुर्लक्ष करीत शेतकरी शेतात राबवत आहे. मात्र, दर हंगामात पीक काढणीला आले की असे संकट येत असल्याचा अनुभव येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.
भालेवाडीत वीज पडून तीन जनावरे ठार
मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात रविवारी व सोमवारी रात्री आठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
भालेवाडी येथे वीज कोसळून कुंडलिक मारुती माने यांची एक गाय, एक शेळी व बोकड अशी तीन जनावरे मरण पावली. रविवारी रात्री जवळपास ३० मिनिटे पावसाने हजेरी लावली.भालेवाडी येथे वीज कोसळून तीन जनावरे मरण पावल्याने माने यांचे ९ ० हजारांचे नुकसान झाले.
महसूल व पशुधन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सोमवारी सायंकाळीही पाऊस पडला. हा अवकाळी पाऊस ऊस लागवड व खोडवा ऊसास पोषक असला तरी द्राक्ष, आंबा बागांचे नुकसान झाले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज