टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूरसह राज्यभरात सध्या गुंठेवारी प्लॉट आणि ले आउट मंजूर नसलेल्या प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहेत. यासंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे प्रहारच्या वतीने प्लॉट व ले आउट मंजूर नसलेल्या प्लॉटची खरेदी विक्री सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
त्यावेळी येत्या आठ दिवसात याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन ना. विखे-पाटील यांनी दिल्याची माहीती प्रहार जनशक्तीचे तुकडेबंदी तुकडेजोड कायदा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी दिली.
सोलापूरला गोविंद कराड हे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून सन २०१८ ते २०१९ या काळात कार्यरत होते.
त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक उपनिबंधक कार्यालयात गुंठेवारी प्लॉट आणि ले आऊट मंजूर नसलेल्या प्लॉटचे हजारो खरेदी खत आहेत.
त्यावेळी कोठेही तुकडेबंदी तुकडेजोड कायदा लागू नव्हता का? असा प्रश्न प्रहारने निवेदनात उपस्थित करत कराड यांची सोलापूरातून बदली झाल्यानंतर त्यांची मुद्रांक उपमहानिरीक्षक या पदावर अखत्यारित येणाऱ्या अनेक पदोन्नती झाली.
मात्र त्यांनी नोंदणी उपनिबंधक कार्यालयात गुंठेवारी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक प्लॉट आणि ले आऊट मंजुर महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र नसलेल्या प्लॉटचे हजारो खरेदी क्र. का. ४/प्र. क्र. २४९/२०३/ खत झाले.
त्यावेळी कुठेही ४५४ दि. १२/०७/२०२१ रोजी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यासाठी प्रतिबंध करण्यास व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने पत्र काढून हुकूमशाही फतवा देऊन संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
याप्रसंगी शहरप्रमुख अजित कुलकर्णी, कार्यकारी प्रमुख खालिद मणियार, अमजद पठाण, जाविद गदवाल, बक्तियार शेख, महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज