ADVERTISEMENT
mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अंदाज खरा ठरला! गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात आयपीएल चषक उंचावला; हार्दिक पांड्या ठरला विजयाचा शिल्पकार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 29, 2022
in राज्य, राष्ट्रीय
दुसऱ्या पर्वात चेन्नईची विजयी सुरुवात; मुंबईचा 20 धावांनी पराभव

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ फायनलमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवताना जेतेपद नावावर केले.

हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुजरातने घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचा सहज पराभव केला.

हार्दिकने गोलंदाजीत १७ धावांत विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीतही महत्त्वपूर्ण ३४ धावा केल्या. शुबमन गिलला दोन जीवदान देणे राजस्थानला महागात पडले. आर अश्विन वर अतिभरवसा ठेवणेहीला महागात पडले.

राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्यांना तालावर नाचवले. हार्दिकने ४ षटकांत १७ धावा देताना ३ मोठ्या विकेट्स घेतल्या.

यशस्वी जैस्वाल व जोस बटलर यांनी सावध सुरुवातीवर भर दिला. पण, यशस्वी ( २२), संजू सॅमसन ( १४), देवदत्त पडिक्कल ( २) हे झटपट बाद झाल्याने बटलरवरील दडपण वाढले होते. हार्दिकने त्याला ( ३९) बाद केले. हार्दिकने स‌‌ॅमसन,

बटलर यांच्यानंतर शिमरोन हेटमायरला ( ११) बाद केले. साई किशोरने RRच्या आऱ अश्विन ( ६) व ट्रेंट बोल्ट (११) यांना माघारी पाठवले. राजस्थानला ९ बाद १३० धावा करता आल्या.

रियान परागने १५ धावा केल्या. साई किशोरने २ षटकांत २० धावांत २, राशिद खानने ४ षटकांत १८ धावांत १, तर शमी ( १-३३) व यश दयाल ( १-१८) यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

२०१७च्या आयपीएल फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने ८ बाद १२९ धावांचा यशस्वी बचाव केला होता. रायझिंग पुणे सुपरजायंट्सना त्यांनी ६ बाद १२८ धावांत रोखून १ धावेने सामना जिंकला होता.

आज प्रत्युत्तरात ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात शुबमन गिलला जीवदान मिळाले, युजवेंद्र चहलने सोपा झेल सोडला. पण, पुढच्याच षटकात प्रसिद्ध कृष्णाने RR ला विकेट मिळवून देताना वृद्धीमान साहाला ( ५) बाद केले. बोल्टने तिसरे षटक निर्धाव फेकले.

पाचव्या षटकात बोल्टने GT चा मॅथ्यू वेडला ( ८) रियान पराग करवी झेलबाद केले. पहिल्या ६ षटकांत गुजरातने २ बाद ३१ धावा केल्या. शुबमनला ( ० व १३) दोन जीवदान मिळाले. चहलने टाकलेल्या ८व्या षटकात शिमरोन हेटमायरने परतीचा कॅच घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. गुजरातला ५० धावा करण्यासाठी ९.२ षटकं लागली

RRचा कर्णधार संजूने १० षटकं झाली तरी आर अश्विनची ४ षटकं राखून ठेवली होती. १२व्या षटकात अश्विन गोलंदाजीला आला.

गुजरातला ५४ चेंडूंत ६९ धावा करायच्या होत्या. पण, हार्दिक पांड्याने अश्विनचे चौकार-षटकारांनी स्वागत करताना शुबमनसह ४३ चेंडूंत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. अश्विनच्या पहिल्याच षटकात १५ धावा आल्या.

त्यामुळे चहलला पुन्हा गोलंदाजीवर आणले गेले आणि त्याने १४व्या षटकात हार्दिकला ( ३४) माघारी पाठवले. यशस्वी जैस्वालने स्लिपमध्ये सुरेख झेल टिपला.

चहलने ( २७ ) यासह पुन्हा आयपीएल २०२२मध्ये पर्पल कॅप नावावर केली. चहलने ४ षटकांत २० धावांत १, बोल्टने १४ धावांत १ विकेट घेतली. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक २७ विकेट्स घेणारा चहल हा पहिलाच फिरकीपटू ठरला.

अश्विनला डेव्हिड मिलरनेही झोडून काढले अन् राजस्थानने सामन्यावरील पकड गमावली. गुजरातला २४ चेंडूंत २२ धावाच करायच्या होत्या आणि त्यांच्याकडे ७ विकेट्स हाताशी होत्या. डेव्हिड मिलरने ताबडतोड फटकेबाजी करताना गुजरातचा विजय पक्का केला. गिल ४५ आणि मिलर १९ चेंडूंत ३५ धावांवर नाबाद राहिले. गुजरातने ७ विकेट्स व ११ चेंडू राखून १३३ धावा केल्या.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

आता पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा; विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाणार

December 8, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक असल्याचे भासवून तरुणीशी विवाह; पती, सासू, सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा

December 8, 2023
बळीराजासाठी मोठा दिलासा! आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात; उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

पावसाचा अंदाज! पुढील 48 तास ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी कायम राहण्याचा अंदाज

December 6, 2023
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

महाराष्ट्राचं लक्ष! मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा; क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी

December 6, 2023
बातमी कामाची! दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात पंतप्रधान मातृवंदना-२ योजना जाहीर

लाडली बहना योजना महाराष्ट्रात लागू होणार, शिंदे सरकारचा मानस; महिलांना मिळणार ‘इतके’ हजार मानधन

December 6, 2023
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

नागरिकांनो! आज तहसीलदारांचे कामबंद आंदोलन; २८ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

December 5, 2023
कर्नाटकात भाजप कोमात, काँग्रेस जोमात; काँग्रेसची जोरदार मुसंडी; बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर

आत्मपरीक्षण! काँग्रेसच्या पराभवासाठी ‘ही’ गोष्ट कारणीभूत? 2024 च्या निवडणुकीआधी वाजली धोक्याची घंटा

December 4, 2023
शेतकऱ्यांनो! पेरणी संदर्भात कृषी अधिकारी यांनी केले महत्त्वपूर्ण आवाहन; यंदाच्या खरीप हंगामात योग्य नियोजन

शेतकऱ्यांना दिलासा! फळपिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत वाढवली, योजनेत सहभागी होण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख

December 3, 2023
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

मोठी बातमी! दोन दिवसांत सर्व गुन्हे मागे घ्या, अन्यथा…; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

December 2, 2023
Next Post
मंगळवेढेकरांना डे-नाईट सामन्याची मेजवानी; शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सलगरमध्ये भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, रमेश भुसे यांचे प्रथम पारितोषिक; येथे करा नाव नोंदणी

ताज्या बातम्या

ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

भैरवनाथ शुगर कारखान्याने एक लाख मेट्रीक टन उसाच्या गाळपाचा टप्पा केला पूर्ण; पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात

December 8, 2023
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

भरगच्च निधी! मतदारसंघातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर, ‘हे’ रस्ते होणार गुळगुळीत; आ.आवताडेंची माहिती

December 8, 2023
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

मोठी बातमी! मंगळवेढ्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू, ‘या’ विद्यार्थिनीस मिळाले पहिले प्रमाणपत्र; तहसीलदार जाधव यांच्या प्रयत्नाला यश

December 8, 2023
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

आता पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा; विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाणार

December 8, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक असल्याचे भासवून तरुणीशी विवाह; पती, सासू, सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा

December 8, 2023
राज्यातील 12.50 कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच; ‘या’ रुग्णांचा देखील समावेश, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार; राज्य सरकारचा निर्णय

नागरिकांनो! शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल येथे रविवारी मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

December 8, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा