
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षातून आतापर्यंत 29 रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये नव्वद वर्षांचे गृहस्थही होते, तर एक वर्षाचे बाळही होते, अशी माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख तसेच कोरोना कक्षप्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांनी दिली आहे.
कोरोना विलगीकरण कक्षात एकूण 103 रुग्ण भरती झाले होते. त्यातील 29 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या 29 जणांत एक रुग्ण तब्बल 90 वर्षांचे होते, तर एक रुग्ण केवळ एक वर्षाचे बाळ होते.मेडिकल कॉलेजच्या पथकाने त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केले आहे.एका रुग्णास न्यूमोनिया होता तसेच मूत्रपिंडाचा आजारही होता. त्यांच्यावर कोविड आयसीयूमध्येच डायलिसीस करण्यात आले. त्यांचा न्यूमोनियाही बरा झाला.
उर्वरित 26 रुग्णांपैकी सात लोकांना न्यूमोनिया होता. पाच लोकांना घसादुखीचा त्रास होता. उर्वरित 14 लोकांना कोरोनाबाधा झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, यांना रक्तदाब, दमा, मधुमेह आणि हृदयविकार आदी त्रास होते. मात्र, त्यांच्यावर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले.
विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या 26 रुग्णांना न्यूमोनिया, 28 रुग्णांना घसादुखीचा त्रास होता म्हणून खोकला, ताप अथवा दम लागल्यास रुग्णालयात तात्काळ येणे गरजेचे आहे. मृत झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश 55 वर्षांपेक्षा जास्त आहेत. म्हणून ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
———————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













