मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील अभूतपूर्व यशानंतर आता मरवडे गावात ग्रामपंचायत कार्यालया शेजारी विठाई परिवार महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँकेचा आज दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थापक स्वप्निल काळुंगे यांनी दिली आहे.
आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली तर उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे.
याप्रसंगी मरवडे परिसरातील सर्व पदाधिकारी, सरपंच झ सदस्य, ग्रामस्थांची प्रमुख उपस्थित असणार आहेत.
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने विठाई परिवार महिला अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, या संस्थेची स्थापना केली गेली आहे.
मंगळवेढा व मोहोळ तालुक्यातील शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आता मरवडे गावात शाखा सुरू होत आहे.
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
“आम्ही आपल्या विश्वासाचा सन्मान करतो” हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी विठाई परिवार महिला अर्बन ही हक्काची संस्था असेल असे आमचे व्हिजन असल्याचे चेअरमन काजल स्वप्निल काळुंगे यांनी सांगितले आहे.
12 टक्के वार्षिक व्याजदर
विठाई परिवार अर्बन येथे वार्षिक ठेवींवर तब्बल 12 टक्के वार्षिक व्याजदर नागरिकांना मिळणार आहे.
दाम दुप्पट ठेव 6 वर्ष
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सर्व नागरिकांना सहा वर्षात आपले पैसे दाम दुप्पट करून दिले जाणार आहेत.
लखपती ठेव योजना
नागरिकांनी 25 हजार 501 रुपये भरल्यानंतर तेरा वर्षांनी एक लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच 39 हजार रुपये भरल्यानंतर नऊ वर्षांनी 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर 59 हजार रुपये भरल्यानंतर फक्त पाच वर्षांनी एक लाख रुपये ग्राहकांना मिळणार आहेत.
0.5 टक्के व्याजदर जादा
ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदर पेक्षा 0.5 टक्के व्याजदर जादा राहील, 18 महिन्याच्या पुढे 12 टक्के व्याजदर राहील.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायिक कर्ज अशा अनेक योजना सुरू केली आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा, करंट खात्यावर 5 टक्के वार्षिक व्याजदर या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायं ६
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज