टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून
दि.30 जून पर्यंत ऑनलाईन माध्यमातून फॉर्म भरता येणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सुरेश पवार यांनी दिली.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पदवीधर मतदारसंघातून दहा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१७ मधील कलम १४१ नुसार प्रथम नोंदणीकृत पदवीधर यादीत 30 जून पर्यंत पदवीधरांना नाव नोंदणी करता येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पदवीधर व सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले शिवाजी विद्यापीठाचे सन २००४ पूर्वीचे पदवीधर याकरिता अर्ज भरण्यास पात्र राहणार आहेत.
विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर “विद्यापीठ निवडणूक- २०२२” या पोर्टलवर पदवीधरांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरता येणार आहे.
अर्जासोबत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत तसेच निवासाचा पुरावा म्हणून आधार कार्ड , निवडणूक ओळखपत्र यापैकी एक द्यावयाचे आहे.
वीस रुपये शुल्क पदवीधरांना भरावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची साक्षांकित प्रत तसेच आवश्यक कागदपत्रासह कुलसचिव , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,
सोलापूर येथे पोस्टाने अथवा प्रत्यक्ष जमा करणे आवश्यक आहे. ज्या पदवीधरांनी सन २०१०, २०१५ आणि २०१७ च्या निवडणुकीसाठी नोंदणीकृत पदवीधर यादीत नाव नोंदवलेले आहे , अशा पदवीधरांनी पुनश्च नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
अशा पदवीधरांच्या याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मात्र पदवीधर नोंदणी केलेल्या पदवीधरांना पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावयाचे आहे,
यासाठी स्वतंत्र जाहिरात व प्रक्रिया विद्यापीठाकडून नंतर सुरू करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.पवार यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज