टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक भारतीय जनता पार्टी व महाविकास आघाडी अतिशय चुरसीची केली. मंगळवेढ्यात मात्र आमदार भारत भालके यांच्या अनुपस्थितीत यांच्या समर्थकांनी प्रचाराची धुरा समर्थपणे संभाळण्याचे काम केले आहे.
पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक अंतीम टप्यात भाजपाने आरोप प्रत्यारोप करत प्रतिष्ठेची केली.यापूर्वी ही निवडणूकीत पदवीदरचा मतदारसंघ भाजपाकडे होता यंदा राष्ट्रवादी शिवसेना काॅग्रेसच्या महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे दिला.
पक्षाने अरूण लाड यांना संधी दिली.ही पदरात पाडण्यासाठी महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक लढवून महाविकास आघाडीचे माध्यमातून पदवीधर व शिक्षक मतदार संघातून संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार निवडून येण्यासाठी कोरोना संकटात फिरत आहेत.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक लढवीत असलेले अरूण लाड व जयंत आजगावकर यांच्या प्रचाराची यंत्रणेची जबाबदारी स्व.आमदार भारत भालके कडे दिली पंरतु दरम्यानच्या काळात आजाराला झुंज देत असताना झालेला अकाली मृत्यूने हा मतदार संघ उघड्यावर पडला.
प्रचार यंत्रणा थांबली अशातच राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे राज्य सरचिटणीस लतीफ तांबोळी यांना प्रचार धुरा स्वताचे खांदयावर घेवून जेष्ठे नेते रामभाऊ वाकडे, मागासवर्गीय सेलचे विजय खवतोडे,महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे,जिल्हा सरचिटणीस भारत बेदरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार पवार,
शिवसेना तालुकाध्यक्ष तुकाराम कुदळे मारूती वाकडे शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजम्मील काझी शिवसेना शहराध्यक्ष सुनील दत्तू संभाजी ब्रिगड शहराध्यक्ष संदीप फडतरे ,युवक शहराध्यक्ष संदीप बुरकुल,
महिला तालुकाध्यक्ष संगिता कट्टे, पंडीत गवळी,आप्पा चोपडे, प्रसिध्दी प्रमूख अशोक माने,प्रविण गोवे, अजिक्य जावळे आदींचे सहकार्य घेवून प्रचार यंत्रणा राबवून महाविकास आघाडी उमेदवार यांना मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
शिवाय ग्रामीण भागात गावभेट दौराही केला.महाविकास आघाडीच्या प्रभावी प्रचार यंत्रणे पुढे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांनी थेट राष्ट्रवादीवर बोगस मतदानाचा आरोपही मंगळवेढ्यात केला.
एकंदरीत सध्या महाविकास आघाडी प्रचार यंत्रणा प्रभावी झाल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे अंतीम टप्यात राबवलेल्या प्रचार यंत्रणेमुळे यानिमित्ताने स्पष्ट होवू लागले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज