मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सरकार येत्या सहा महिन्यांत बँक ठेवींवरील विमा संरक्षणाची मर्यादा ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपये करू शकते. यावर गांभीर्याने विचार सुरू आहे. मात्र, नवीन मर्यादा किती असेल, याचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही.
अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, नवीन मर्यादा निश्चित करताना अनेक पैलू तपासले जात आहेत,
जसे की किती खातेधारकांना, ठेवीदारांना याचा लाभ होऊ शकेल, किती रक्कम विम्याच्या कक्षेत येईल आणि सरकार किती हमी देईल, त्यासाठी सरकारला किती आर्थिक रकमेची तरतूद करावी लागेल.
शेवटची मर्यादावाढ ५ वर्षांपूर्वी झाली होती
भारतात ठेवी विमा संरक्षणाची सुरुवात १९६२ मध्ये झाली. त्या वेळी प्रत्येक खातेदारासाठी १,५०० रुपये मर्यादा होती. ती वेळोवेळी वाढवण्यात आलीः १९७६ मध्ये ती २० हजार रुपये, १९८० मध्ये ३० हजार रुपये, १९९३ मध्ये ती १ लाख रुपये करण्यात आली.
फेब्रुवारी २०२० मध्ये पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संकटानंतर ती ५ लाख रुपये झाली. एखादी बँक दिवाळखोर झाली, तर खातेदाराला त्याच्या जमा रकमेपैकी विमा मर्यादपर्यंतच पैसे परत मिळतात.
रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकवर कारवाई केली त्यानंतर बँक जमा विमा वाढवण्याच्या चर्चेने आणखीच वेग घेतला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज