टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरु आहे.
राज्य सरकारला याआधी या प्रकरणात अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. तरीही राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. ही याचिका आता सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर आता पुन्हा सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर येत्या ११ सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे.
मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विनोद पाटील यांनीच सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर आता ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय येणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. मराठा समाज अनेक वर्षांपासून न्यायाची वाट पाहत आहे. तर समाजाला कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे 11 तारखेला होणारी सुनावणी न्याय मिळण्याची अंतिम संधी मानली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आता याबाबतची जबाबदारी आहे, त्याचं कारण म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केलं, तसेच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी देखील ते प्रयत्न करतील अशी अपेक्षा.
मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, यासाठी विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
मराठा समाजाला २०१९ मध्ये एसईबीसी हे शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्यात आले होते. हे आरक्षण उच्च न्यायालयात वैध ठरले होते. सर्वोच्च न्यायालयाने मात्र मराठा आरक्षण रद्द केले होते.
या निर्णयाचा पुनर्विचार करावा, यासाठी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर आता ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे याचिककर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.(स्रोत:साम TV)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज