टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाचे महाभयंकर संकट सुरू असताना चक्क सरकारी रखवालदारांच वाळू चोरी करत असतानाचा प्रकार पंढरपूर तालुक्यत घडला आहे.
महसूल विभागातील तलाठी अमर पाटील यांनी स्वतःच्या बांधकामासाठी 2 टिपर वाळू ओझेवाडी येथुन जेसीबीच्या साहाय्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने काढून न्हेताना जुना कराड नाका परिसरात पोलिसांनी 2 टिपरसह अंदाजे 30 लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यामध्ये तलाठी अमर धर्मराज पाटील यांच्यासह रवींद्र अर्जुन पाटोळे, गणेश महादेव बागल, विशाल भारत अवताडे, बापू आत्माराम कुंभार, सावकार गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती तपास अधिकारी राजेंद्र गाडेकर यांनी दिली.
या घटनेमुळे संपूर्ण महसूल विभागाच्या संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणाच्या संगनमताने वाळू चोरी चालू होती याचीच चर्चा पंढरपूर तालुक्यात सुरू आहे.
वाळू चोरी करणारे आणि वाळू चोरीस सहकार्य करणारे तलाठी, सर्कल यांच्यावर प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस वाळू चोरावर कारवाई करत असतानाच महसूल विभागाचे अधिकारीच वाळू चोरीत सापडल्याने राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज