टीम मंगळवेढा टाईम्स । भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी खबरदारीचे अनेक पर्याय वापरले जात आहेत. मात्र, तरीदेखील देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. हा एक चिंतेचा विषय बनत आहे.
तसेच आता भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 1,46,208 वर गेला आहे. पण कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 61,052 रुग्णांवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 4.0 ची घोषणा देशात केली. पण यामध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानुसार अनेक सेवांमध्ये सूट दिली जात आहे.पण दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला असून, रुग्णांची एकूण संख्या 1,46,208 झाली आहे.
सध्या देशात 80,969 कोरोनाचे ऍक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती वर्ल्डोमीटर्सवर देण्यात आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे 61,052 रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णायातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 4,167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
आत्तापर्यंत 31 लाखांहून अधिक चाचण्या
देशात वाढत चाललेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या हा एक चिंतेचा विषय बनत आहे. परंतु, प्रशासनाकडूनही विशेष खबरदारी घेतली जात आहे. आत्तापर्यंत 31,26,119 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सध्या 80,969 ऍक्टिव्ह केसेस आहेत.
8 हजारपेक्षा जास्त रुग्णांची प्रकृती चिंताजनक
देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत 4,167 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर सध्या 8,944 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज