टीम मंगळवेढा टाईम्स ।
इमॅन्युअल मार्थोमा स्कूल पुणे येथे सिल्वरझोन ओलंपियाड नवी दिल्ली या फाउंडेशन तर्फे गणित ओलंपियाड परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये कु.ओवी पवनकुमार बिनवडे हिने 100 पैकी 76.52 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला.
इमॅन्युअल मार्थोमा स्कूलच्या मुख्याध्यापिका संध्या सुरेश यांच्या हस्ते कु.ओवी बिनवडे हिला हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. ओवी बिनवडे ही मुळची ब्रह्मपुरी ता.मंगळवेढा येथील रहिवासी आहे.
ओवी बिनवडे हिला पुणे येथील मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका स्नेहल कदम- बिनवडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
बिनवडे हिच्या उज्वल यशाबद्दल कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंगचे राजेंद्र कदम,निवेदक दिलीप बिनवडे ब्रह्मपुरीकर,पुणे येथील सेवानिवृत्त लेफ्टनंट सुभेदार सुहास घनवट,
निवास घनवट, प्रा.लक्ष्मण नागणे, गौरी कदम, मंदाकिनी बिनवडे, अंजली बिनवडे, पञकार प्रमोद बिनवडे, पवनकुमार बिनवडे इ.अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज