
स्वप्नाली फुगारे । जळगावात गुरुवारी सोन्याच्या भावाने ५० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे . सकाळी सराफ बाजार उघडल्यानतंर सोन्याचा भाव ४ ९ हजार २०० तर जीएसटीसह ५१ हजार ५०० रुपयांवर पोहोचला होता. Gold crosses 50,000 mark
आठवडाभरात सोन्याचे दोन हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता देखील सराफ व्यावसायिकांनी वर्तवली आहे . कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरू झाल्यानंतरही कायम आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.
लग्नसराई देखील काही प्रमाणात सुरू झाल्याने सोने चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे . सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने गुंतवणूकदार देखील खरेदीकडे वळले आहेत.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












