टीम मंगळवेढा टाईम्स । आपल्या स्वयंपाक घरातच असे अनेक पदार्थ असतात, ज्यांच्या वापराने आपण निरोगी राहू शकतो. सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्येकाची इच्छा आहे की, आपल्यावर छोट्या-मोठ्या आजारासाठी दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ नये.
जर खरोखरंच दवाखान्यात जाणे टाळायचे असेल तर काही घरगुती पदार्थांच्या वापराने तुम्ही रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात…
हे आहेत ते पदार्थ
1 आलं
आलं सर्दी, खोकला, अजीर्ण यावर गुणकारी आहे. यासाठी आल्याच्या रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. यामुळे पोटात गॅस, पोटदुखी व मळमळ थांबते. आल्याचा चहा प्यायल्यास सर्दी, डोकेदुखी दूर होते.
2 हळद
रोगप्रतिकरकशक्ती वाढवण्यासाठी हळद खुप उपयोगी आहे. यामुळे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. व्हायरसशी लढण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात हळद मिसळून हे पाणी प्या
3 आळशी
आळशीच्या बीयांमध्ये खुप औषधी गुणधर्म आहेत. यांच्या सेवनाने अनेक आजार दूर राहतात. याच्या सेवनाने रक्तप्रवाह सुरळती होतो, कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतात. एक चमचा आळशी पावडर गरम दूधात घालून प्यायल्याने तसेच दह्यासोबत सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
4 तुळस
रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढवण्या तुळस लाभदायक आहे. थकवा दूर करण्यासाठी सुद्धा तुळस गुणकारी आहे. रोज सकाळी तुळशीची पाने खावीत. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
There will be no time to go to the hospital; These ‘home’ foods will keep you healthy
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज