टीम मंगळवेढा तिमेस |
प्रेयसी समवेत एकत्र राहण्यासाठी प्रेयसीच्या आत्महत्येचा बनाव करून दुसऱ्या मनोरुग्ण महिलेचा खून केल्याप्रकरणी अटकेतील प्रियकर-प्रेयसीच्या पोलिस कोठडीची मुदत काल सोमवारी संपली होती.
पाठखळ येथील याप्रकरणी त्यांना मंगळवेढ्यातील न्यायाधीश मेघा माळी यांना पुन्हा २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
भावजयशी असलेल्या प्रेमसंबंधातून दिराने कट रचून गोपाळपूर येथील मनोरुग्ण महिलेचा गळा दाबून खून करून तिला प्रेयसीच्या (भावजय) घरासमोर जाळून टाकले.
सुरुवातीला खून की आत्महत्या असा झालेला तपास नव्या वळणावर गेला. तपास अधिकारी दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी कमी वेळेत तपास करत न्यायालयात मृताच्या नातेवाईकांचा डीएनए तपासणी करिता पाठवायचा आहे.
आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुणाची मदत घेतली का? याचा तपास करायचा आहे. आरोपीने मृतदेह कुठे ठेवला त्या ठिकाणचा साक्षीदार कोण याचा तपास करावयाचा आहे. आरोपीने कुठले वाहन वापरले, यासाठी कुणी मदत केली आहे का? या कारणास्तव वाढीव पोलिस कोठडी मागणी केली.
सरकार पक्षातर्फे अॅड. अमोल क्षीरसागर यांनी काम पाहिले. आरोपी तर्फे अॅड संताजी माने यांनी, आरोपींना यापूर्वी पाच दिवस पोलिस कस्टडी दिली आहे. त्यामध्ये बराचसा तपास झाला आहे.
त्यामुळे आता पोलिस कोठडीची आवश्यकता नाही, म्हणून कमीत कमी व पोलिस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला. आरोपीतर्फे अॅड. संताजी माने व अॅड सागर टाकणे यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज