मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पुण्यासह राज्यात जीबीएस आजाराने थैमान घातलंय. नागपूरमध्ये ४५ वर्षांच्या एका रुग्णाचा मृत्यू झालाय. यासह राज्यात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संक्या ९ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे सोलापूर, नागपूरमध्ये जीबीएस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
नागपुरात दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस आजाराबाबत मोठी माहिती दिलीय. चिकन खाल्ल्यानं जीबीएसचा धोका असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.
कमी शिजवलेल्या चिकनमधून जीबीएसचा धोका आहे. पोल्ट्री फार्ममधून नमुने घेतल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये जीबीएसबाबत ही माहिती समोर आली असल्याची माहिती खडकवासल्याच्या नागरिकांनी मला दिलीय असं अजित पवार यांनी सांगितलं.
जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे.
मांस कच्चे, कमी शिवजवलेले खाल्ल्याने जीबीएस होत असल्याचे समोर आले आहे. पण लगेच आता तुम्ही कोंबड्या मारण्याचे जाळून टाकण्याची गरज नाही असंही अजित पवार म्हणाले.
कोंबडी खाणाऱ्याला प्रत्येकाला GBS ची लागण होईल असं नाही– डॉ.अविनाश भोंडवे
जीबीएस होऊ नये म्हणून केवळ शिजवलेलं मांस खा, असेही डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले. जर जीबीएसचा जिवाणू कोंबड्यांमध्ये असेल तरच माणसाला याची लागण होऊ शकते,
पण प्रत्येक कोंबडी खाणाऱ्याला याची लागण होईल, असं नाही. तसेच GBS विषाणूमुळे प्रत्येक व्यक्तीला हा आजार होईल असंही नसल्याचे डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज