mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गलगत कंटेनरमधून गॅस काढून काळ्या बाजारात विक्री, ६० लाखांचा मुद्देमाल जप्त; मंगळवेढ्यातील एकाचा समावेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 12, 2023
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

सोलापूर ते मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गलगत सोहाळे शिवारात असणाऱ्या हॉटेल शिवराज पॅलेसच्या आवारात चक्क कंटेनरमधून सिलेंडर टाक्यांमध्ये चोरून गॅस भरण्याचा जीवघेणा खेळ करून

तो काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जात असताना कामती पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोन आरोपींसह ६० लाख २६ हजार ३६९ रुपयांचा मुद्देमाल कामती पोलिसांनी हस्तगत केला असून स.पो.नि.राजकुमार डुणगे यांनी कामतीचा नुकताच पदभार घेतला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हॉटेल शिवराज पॅलेसच्या पाठीमागे तुकाराम नाईकनवरे (वय ३५, व्यवसाय- हॉटेल चालक, रा. सोहाळे), संजय पाटील (वय ३६, व्यवसाय ड्रायव्हर, रा.डोंगरगाव, ता.मंगळवेढा) व कंटेनर चालक असे तिघे मिळून (क्र.एम. एच.४८ एवाय ४६९८) हा

कॅप्सूल आकाराचा गॅस भरलेला कंटेनरमधून स्फोटक व ज्वलनशील गॅस कंटेनरमधून काढून गॅस टाक्यांमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री करण्याकरीता कंपनीच्या कोणत्याही संमती शिवाय चोरी करीत असताना मिळून आले आहेत.

या कंटेनरमध्ये डिलीव्हरी चलन पावतीप्रमाणे एकूण १७ हजार ६४० किलो वजनाचा ०८ लाख ४० हजार ३६९ रुपये किंमतीचा गॅस असून यामधून घरगुती व व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरून

त्या टाक्या अशोक लेलँड पिकअप (क्र.एम.एच.२५ एजे ५१८६) वाहनामध्ये भरण्यात येत होत्या. या पिकप मध्ये ५६ रिकाम्या गॅस सिलेंडर टाक्या व १८ गॅस सिलेंडर टाक्या पूर्णपणे भरलेल्या, एक इलेक्ट्रीक वजनकाटा आढळून आला आहे.

कामती पोलिसांनी छापा टाकून ६० लाख २६ हजार ३६९ रुपयांचा हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून याबाबत अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

रॅकेटमध्ये आणखीन संशयित असण्याची शक्यता

गॅस कंटेनरमधून ज्वलनशील असणारा गॅस घरगुती व व्यावसायिक सिलेंडर टाक्यांमध्ये भरणे हे अत्यंत धोकादायक काम आहे. शिवाय पिकअप मध्ये सुमारे ७५ टाक्या आढळून आल्या आहेत. इतका गॅस कंटेनर मधून कमी होतो, हे वरिष्ठांना कसे काय कळत नव्हते….? त्यामुळे या रॅकेटमध्ये आणखीन किती जणांचा सहभाग आहे… ? याचा तपास करणे पोलीस यंत्रणेच्या समोर आव्हान असणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गॅस

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोलापुरात नेमकं काय घडलं?

January 3, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

खबरदार! मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही; प्रशासकीय अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम

January 4, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

खळबळ! वेळेत बिले सादर न केल्यास उमेदवारांसह यांच्यावरही गुन्हे; निवडणूक अधिकाऱ्यांचे इशारा; दंडाचीही तरतूद

January 2, 2026
धक्कादायक! शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या आजीसह नातवावर तरसाचा हल्ला; नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

धक्कादायक! शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या आजीसह नातवावर तरसाचा हल्ला; नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

January 2, 2026
स्वप्नपूर्ती! येत्या काही महिन्यातच २४ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार; दक्षिण भागाचा दुष्काळाचा कलंक पुसलेला दिसेल; आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन

स्वप्नपूर्ती! येत्या काही महिन्यातच २४ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार; दक्षिण भागाचा दुष्काळाचा कलंक पुसलेला दिसेल; आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन

January 1, 2026
Next Post
मंगळवेढ्यात सासूच्या खून प्रकरणात जावई अटकेत; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

Breaking! पिण्याच्या पाण्याच्या हौदात विषारी औषध टाकून भरार असलेल्या पोलीस पाटलाला सांगली जिल्ह्यातून केली अटक

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 4, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोलापुरात नेमकं काय घडलं?

January 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..