टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील २५ जिल्हा परिषद आणि २८४ पंचायत समितीसाठी आरक्षणाची अंतिम अधिसूचना दि.५ ऑगस्ट रोजी जारी करण्यात येणार होती. तर ८ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती,
मात्र राज्य निवडणूक आयोगाने तातडीने आदेश काढून अंतिम आरक्षण अधिसूचना व प्रारूप मतदार यादी या दोन्ही प्रक्रिया तत्काळ थांबवल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे पुढील कामकाज थांबले आहे. या प्रकारामुळे इच्छुक उमेदवार निराश झाले असून त्यांना आता कधी काम सुरू होणार असा प्रश्न पडला आहे.
दि.५ ऑगस्ट २०२२ रोजी २५ जिल्हा परिषद आणि २८४ पंचायत समित्यांमध्ये जागांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना जारी करण्यात येणार होती.
दि . ८ ऑगस्ट २०२२ रोजी १३ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये बुथनिहाय अंतिम मतदार यादी जारी करण्यात येणार होती.
प्रारूप मतदार यादी १२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये १० ऑगस्ट २०२२ रोजी जारी करण्यात येणार होती.
दरम्यान, महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करून त्याद्वारे जिल्हा परिषदांच्या एकूण जागांची संख्या बदलली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आतापर्यंत केलेल्या सीमांकन आणि आरक्षणाच्या सर्व प्रक्रिया रद्द केल्या आहेत आणि अशी प्रक्रिया नव्याने सुरू केली जाईल अशी तरतूद केली आहे.
आतापर्यंत केलेल्या सर्व प्रक्रिया थांबवण्याचे आणि आरक्षणासाठी किंवा मतदार याद्यांसाठी अंतिम अधिसूचना जारी होण्याची प्रतीक्षा करण्याचे निर्देश दिले आहेत.
२८ जुलै रोजी झाली होती
आरक्षण सोडत जिल्ह्यातील जि.प. व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी दि.२८ जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या.
त्यानंतर दि.५ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण अधिसूचना व प्रा मतदार यादी जाहीर होणार होती. मात्र आता या कामकाजावरच स्थगिती आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज