टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी शिवम हॉस्पिटल वेळापूर आणि डॉ.स्वप्नील कोकरे मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत मूळव्याध, भगेंदर, फिशर या आजारांसाठी मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
“साई समर्थ हॉस्पिटल” येथे मोफत तपासणी शिबीर
मंगळवेढा धर्मगाव रोडवर शिर्के हॉस्पिटल शेजारी असलेल्या “साई समर्थ हॉस्पिटल” येथे मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
फक्त 9 हजारात शस्त्रक्रिया, सोबत सर्व चाचण्या
दरम्यान, तपासणी नंतर ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज भासल्यास त्यांना सवलतीच्या दरात फक्त 9 हजारात शस्त्रक्रिया, भूल, शस्त्रक्रियेची सर्व औषधे, रक्त तपासण्या, ईसीजी, फिटनेस करण्यात येणार आहेत.
रुग्णांची येण्या-जाण्याची मोफत सोय
ऑपरेशनला शिवम हॉस्पिटल वेळापूर येथे येण्यासाठी रुग्णांची येण्या-जाण्याची सोय देखील हॉस्पिटलच्या वतीने मोफत करण्यात येणार आहे.
फायदे
रुग्णांना ऍडमिशनची गरज नाही, आताधुनिक पद्धतीने उपचार केले जाणार, लेझर, वेसल सिलर सर्व अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज ऑपरेशन थिएटर, स्त्री मुळव्याध तज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.
लक्षणे
शौचास आग होणे, शौचानंतर दुखावा फार असणे, कोंब बाहेर येणे, शौचाच्या वेळा रक्त पडणे खाज येणे, गुदद्वार (चुंबळ) बाहेर येणे, भगेंदर इत्यादी सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार केले जात आहेत.
50% सवलतिच्या दरात मर्यादित काळापर्यंतच उपचार
या उपचारावर इतर ठिकाणी होणाऱ्या खर्चापेक्षा 50% सवलतिच्या दरात मर्यादित काळापर्यंतच उपचार करण्याची सुवर्णसंधी शिवम हॉस्पिटल वेळापूर यांनी उपलब्ध करून दिली आहे.
उपलब्ध सुविधा
कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे, मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध, त्याबद्दल अगोदर कल्पना देणे आवश्यक.
तज्ञ डॉक्टरांची टीम
पहिली स्त्री मुळव्याध तज्ञ डॉ.उर्मिला पाटील, डॉक्टर अभिजीत पाटील, डॉक्टर बबनराव पाटील, डॉक्टर अभिषेक पाटील या डॉक्टरांची टीम उपलब्ध असणार आहे.
तपासणीसाठी नाव नोंदणी आवश्यक
आज सोमवारी होणाऱ्या मुळव्याध, भगेंदर, फिशर या मोफत तपासणी शिबिरासाठी डॉ.अभिजित पाटील 9552285320 या नंबरवर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
या शिबिरात मूळव्याध, भगेंदर, फिशर, शौचाच्या जागी आग होणे, पू-रक्त, खाज येणे, इ आजारांवर मोफत तपासणी करण्यात येणार आहे . या शिबिरासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व या संधीचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी 9552285320, 9271807071 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन शिवम हॉस्पिटल वेळापूर व डॉ.स्वप्नील कोकरे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज