mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 25, 2020
in सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

टीम मंगळवेढा टाईम्स । 

बार्शी तालुक्‍यात ज्या गावांमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थांच्या एकमताने बिनविरोध निवडून येतील, त्या गावांमधील सर्व ग्रामस्थांना आवश्‍यकतेनुसार मोफत रक्तपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय श्री भगवंत ब्लड बॅंकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी घेतला आहे.

असा निर्णय घेणारी भगवंत रक्तपेढी ही राज्यातील पहिली रक्तपेढी आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी रक्तदानाच्या चळवळीला गती देणाऱ्या भगवंत ब्लड बॅंकेच्या माध्यमातून ही अभिनव संकल्पना मांडली आहे.

बार्शी तालुक्‍यात 94 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेले आठ महिने कोरोना महामारीने जगात थैमान घातले होते.

त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने टाळेबंदी घोषित केली होती. यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. रोजगार निर्मिती ठप्प झाली. सर्व क्षेत्रांवर आर्थिक मंदीची लाट आली.

अशा परिस्थितीमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडी झाल्या तर निवडणुकीमध्ये होणारा अवास्तव खर्च वाचेल. गावागावांमध्ये असलेले सूडबुद्धीच्या, ताण – तणावाच्या व आरोप – प्रत्यारोपांच्या राजकारणाला पायबंद बसेल. बिनविरोध निवडीमुळे गावा-गावांमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण होईल.

गावांमध्ये निवडणुकीदरम्यान होणारे संघर्षाचे प्रसंग टळतील. गावा – गावांमध्ये शांतता राहील तसेच बिनविरोध निवडीमुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य विकासासाठी एकजुटीने काम करतील.

त्यामुळे उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमदार राजेंद्र राऊत यांनी ग्रामीण रुग्ण रक्त कल्याणकारी योजना मांडली असल्याचे शशिकांत जगदाळे यांनी या वेळी सांगितले.

मोफत रक्त देण्यामागे बिनविरोध निवडणुकीला चालना देणे, सर्व गावकऱ्यांमध्ये निरोगी व निकोप वातावरण निर्माण करणे, शस्त्रक्रिया व विविध आजारांमध्ये उपचारादरम्यान अत्यावश्‍यक असलेले रक्त मोफत देऊन ग्रामीण भागाविषयी असलेली सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणे हा व्यापक हेतू असल्याचेही श्री. जगदाळे यांनी या वेळी सांगितले.

भगवंत ब्लड बॅंकेच्या विधायक व कल्याणकारी योजनांमध्ये श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे व शिक्षण संस्था चालक रावसाहेब मनगिरे यांचेही भरीव मार्गदर्शन लाभत असल्याचे श्री. जगदाळे यांनी सांगितले.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामपंचायतनिवडणूक

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

खळबळ! हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात डल्ला मारणारा मंगळवेढ्याचा व्यावसायिक गजाआड; सव्वाआठ लाखांचे दागिने जप्त

February 13, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 17, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
Next Post
Breaking ! आता निवडणुकीनंतरच समजणार गावाचा सरपंच; आरक्षण सोडत १५ जानेवारीनंतर

सरपंच पदासाठी 'या' वर्षानंतर सातवी पासचे सर्टिफिकेट अनिवार्यच; निवडणूक आयोगाचा आदेश

ताज्या बातम्या

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा उद्या मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा उद्या मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 17, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
धक्कादायक : मंगळवेढ्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आई मला माफ कर…! 23 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नोट वाचून पोलीसही हादरले

February 17, 2026
समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

February 16, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

February 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..