mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपने ‘या’ पक्षाला मदत केली; शहाजीबापू पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 24, 2025
in राजकारण, सोलापूर
आमदार शहाजी पाटील यांनी केले खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..’घर की मुर्गी दाल बराबर’ आहे; स्वतःच्याच पक्षाला लगावले टोले

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

भाजपने आपल्याला एकटे पाडलं, विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आता आणखी एक आरोप केला. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला.

त्यामुळे सांगोल्यामध्ये आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमधील वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिंदेंचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा शेकापच्या बाबासाहेब पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर आता नगरपालिकेच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर आरोप केला आहे.

आपल्याला पाडण्यासाठी भाजपने काम केलं

लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही आपण प्रचार केला आणि भापजच्या उमेदवाराला 15 हजारांचे मताधिक्य दिलं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने आपल्याला पाडण्यासाठी शेकापच्या उमेदवाराला मदत केली असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला.

सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र केलं आहे. त्यामुळे शहाजीबापू पाटील हे नाराज आहेत.

कुत्री-मांजरं आपल्याला घाबरवत आहेत

भापजवर टीका करताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, “सांगोल्याची निवडणूक ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनवलं जात आहे, हेलिकॉप्टरमधून येऊन यांनी गुंडशाही सुरू केली आहे. भाजपने आपलं कंबरडं मोडलं. विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत मी इतकं प्रामाणिकपणे वागून ते असं का वागले?”

शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले की, “पण मी लढणारी औलाद आहे. पैशाच्या जीवावर तालुका विकत घेऊन जायचा नाद करू नका. मला महाराष्ट्र घाबरतो, आणि ही कुत्री मांजरं आता मला घाबरावयला लागली आहेत.

या तालुक्यात दोन राजे… एक गणपतराव देशमुख आणि दुसरा शहाजीबापू. आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजनाचा अधिकारी त्यांच्या कार्यकर्त्यांना उरला नाही.”

शहाजीबापू जखमी वाघ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सांगोल्याचा वाघ म्हणून शहाजी बापू ओळखले जातात. तो जखमी शेर आहे. 3 तारखेला फटाके तयार ठेवा. कोई माने या ना मानेच.. सांगोल्यात वन अँड ओन्ली आनंदा माने.

शहाजीबापू, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मागे हा एकनाथ शिंदे आहे. तुमचा कार्यक्रम कुणीही करू शकणार नाही. बापू हळवा आणि तळागाळातील कार्यकर्ता आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. बापूला तुम्ही किती वेळा फसवणार? एकदा, दोनदा… पण आता तुम्ही बापूला फसवू शकणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपला टोला लगावला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार शहाजी पाटील

संबंधित बातम्या

खळबळ! निष्ठावंत खंडू खंदारे यांच्या नाराजी सूर कोणाला भोवणार? नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला की प्रभाग उमेदवाराला; मातंग समाजाला डावलल्यामुळे तीव्र नाराजी

खळबळ! निष्ठावंत खंडू खंदारे यांच्या नाराजी सूर कोणाला भोवणार? नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला की प्रभाग उमेदवाराला; मातंग समाजाला डावलल्यामुळे तीव्र नाराजी

November 23, 2025
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

एकनाथ शिंदे तोफ धडाडणार! नाराजी नाट्याचा पुढचा अंक आज सोलापुर जिल्ह्यात दिसणार? भाजपचा अहंकार जाळण्याचे आवाहन

November 23, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकसाठी ५८ जण मैदानात; अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरणार

November 22, 2025
बर्थडे गिफ्ट! आमदार समाधान आवताडे यांचे बंधू बिनविरोध नगरसेवक; संजय आवताडे यांनी मोहीम केली फत्ते; सोमनाथ आवताडेंच्या रूपाने मंगळवेढ्यात भाजपची विजय सलामी

बर्थडे गिफ्ट! आमदार समाधान आवताडे यांचे बंधू बिनविरोध नगरसेवक; संजय आवताडे यांनी मोहीम केली फत्ते; सोमनाथ आवताडेंच्या रूपाने मंगळवेढ्यात भाजपची विजय सलामी

November 21, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

रंगदार लढत! आजोबा आणि नातू एकाच वेळी रिंगणात; आजोबा नगराध्यक्ष पदासाठी तर नातू नगरसेवक पदासाठी मैदानात

November 21, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

राजकीय क्षेत्रात खळबळ! महिला राखीव जागेवर पुरुषाचे नामनिर्देशन पत्र दाखल; छाननीत अर्जही वैध

November 20, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

भाजप नेत्याच्या मुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओपन चॅलेंज; व्हिडिओने सोलापूर जिल्ह्यात खळबळ

November 19, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याने गुन्हा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

November 16, 2025
Next Post
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मोठी बातमी! पायी चालत जाणाऱ्या तरुणास मोटर सायकलची धडक बसल्याने जागीच मृत्यू; मंगळवेढ्यात मोटर सायकल चालकाविरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? 50 टक्क्यांवरील आरक्षणाचा फटका बसणार? आरक्षणाची सद्यस्थिती काय?

November 24, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मोठी बातमी! पायी चालत जाणाऱ्या तरुणास मोटर सायकलची धडक बसल्याने जागीच मृत्यू; मंगळवेढ्यात मोटर सायकल चालकाविरुध्द गुन्हा दाखल

November 24, 2025
आमदार शहाजी पाटील यांनी केले खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..’घर की मुर्गी दाल बराबर’ आहे; स्वतःच्याच पक्षाला लगावले टोले

खळबळ! विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपने ‘या’ पक्षाला मदत केली; शहाजीबापू पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

November 24, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी माहेरहून दहा लाख रुपये मागितले; पैशाच्या तगाद्यामुळे सुनेची आत्महत्या

November 24, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी नगरपालिका बचाव आघाडी तयार होणार? उमेदवार लागले तयारीला; गोपनीय बैठकांचे सत्र सुरू

November 24, 2025
खळबळ! निष्ठावंत खंडू खंदारे यांच्या नाराजी सूर कोणाला भोवणार? नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला की प्रभाग उमेदवाराला; मातंग समाजाला डावलल्यामुळे तीव्र नाराजी

खळबळ! निष्ठावंत खंडू खंदारे यांच्या नाराजी सूर कोणाला भोवणार? नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला की प्रभाग उमेदवाराला; मातंग समाजाला डावलल्यामुळे तीव्र नाराजी

November 23, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..