टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजवला असून कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक व आमदार प्रशांत परिचारकांचे वडील प्रभाकर परिचारक देखिल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. Former MLA of Pandharpur Sudhakar Pant Paricharak contracted corona
पंढरपूरमध्ये आज तब्बल 67 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. यामध्ये पंढरपूर शहरात 32 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुग्ण आढळले आहेत. भोसे गावात मध्ये आज तब्बल 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. यामध्ये 11 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे.
पंढरपूरच्या ‘या’ भागामध्ये आढळले नवे रुग्ण
आढीव 1 , भोसे 21 , करकंब 1 , खेड भोसे 7 , लक्ष्मी टाकळी 1 , मेंढापूर 1 , पिराची कुरोली 1 , रोपळे 1 , शेगाव दुमाला 2 असे रुग्ण आढळून आलेत . तर शहरांमध्ये अनिल नगर -1 गांधी रोड 1 , इंदिरा गांधी भाजी मार्केट 1 , जुना कराड नाका 1 , जुनी पेठ 4 कोळी गल्ली 2 लिंक रोड 1 महाद्वार 1 , महात्मा फुले नगर 1 , नागपूरकर मठाजवळ 1 , नाथ चौक 2 , के बी पी कॉलेज जवळ 2 , एमएससिबी जवळ 1 , रामबाग 1 , संत पेठ 1 , सावरकर नगर 1 , सावतामाळी मठाजवळ 2 , उमदे गल्ली 1 , वीर सागर नगर 2 असे शहराच्या विविध भागात कोरोना रुग्ण सापडले असून पंढरपूरची संख्या ७५१ वर पोहचली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज