टीम मंगळवेढा टाईम्स । तपास आणि विविध गुन्ह्यांच्या प्रकरणांचा सामना करत असलेल्या तबलिगी जमातीच्या ९५५ परदेशी जमातींना ९ वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने निझामुद्दीन मरकझप्रकरणी दिले आहेत. सध्या हे तबलिगी दिल्लीतील वेगवेगळ्या क्वारंटाइन सेंटरमध्ये राहत होते. या सर्व जमातींच्या खाण्या – पिण्याची सर्व व्यवस्था तबलिगी जमातीने करावी , असेही हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
सर्व परदेशी जमातींना ते सध्या असलेल्या क्वारंटाइन सेंटर्समधून हलवून ९ निश्चित केलेल्या ठिकाणी ठेवावे असे हायकोर्टाने म्हटले आहे . सर्व ९ निश्चित जागांवर कोणकोणत्या तबलिगींना ठेवण्यात आले आहे , याची यादी दिल्ली पोलिसांना देण्यात यावी , असेही कोर्ट म्हणाले . या परदेशी तबलिगींना ज्या ठिकाणी ठेवण्यात येईल , तेथून ते विनापरवानगी कुठेही जाऊ शकणार नाहीत , असा आदेशही कोर्टाने दिला आहे.
दिल्लीच्या निझामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या मरकझमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तबलिगींव्यतिरिक्त परदेशातील तबलिगीही सहभागी झाले होते.
Foreign Tablighi tribes should be relocated to different places; Order of the High Court
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज